28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeSportsटीम इंडियाने फक्त एकच करावं, मग वर्ल्ड कप आपलाच! ईशांत शर्माचा दावा

टीम इंडियाने फक्त एकच करावं, मग वर्ल्ड कप आपलाच! ईशांत शर्माचा दावा

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे दुखापती झालेले मुख्य खेळाडू संघात परतले आहेत.

आगामी वर्ल्ड कप २०२३ चा थरार ५ ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार आहे. भारतामध्ये यंदाच्या वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आल्यान टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. २०११ मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळीही भारताकडेच वर्ल्डकपचं यजमानपद होतं. यंदा रोहित अँड कंपनी आपली पूर्ण ताकद लावताना दिसेल. कारण घरच्या मैदानावर वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडिसाठी ही मोठी संधी असणार आहे. अशातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या मते एक गोष्ट केली तर परत एकदा टीम इंडिया परत एकदा चॅम्पियन होणार आहे.

टीम इंडियाला यंदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी असून संघाला सामने घरच्या मैदानावर असल्याचा फायदा होणार आहे. तुम्हाला तगड्या संघाचा सामना करावा लागणार आहे. २०११ ला तशा प्रकारे संघांना तोंड द्यावं लागलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियासंघाविरूद्ध सर्व संघ ताकदीने खेळला होता. मला वाटतं की यावेळीसुद्धा संपूर्ण टीम ताकदीने खेळली तर वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी असल्याचं ईशांत शर्मा याने म्हटलं आहे. जिओ सिनेमाच्या होम ऑफ हीरोजच्या शोमध्ये तो बोलत होता. ईशांत शर्मा याने सांगितल्यानुसार टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याची मोठी संधी आहे.

मात्र टीम इंडियासम रखडतर आव्हान असणार आहे. कारण आयपीएलमध्ये परदेशी खेळाडू भारतामध्ये खेळून गेले असल्याने त्यांनाही भारतीय ग्राऊंडचा चांगला अंदाज असणार आहे. त्यामुळे परदेशी आयपीएल स्टार खेळाडूंसाठी मिनि होम ग्राऊंड असल्यासारखं आहे. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी म्हणजे दुखापती झालेले मुख्य खेळाडू संघात परतले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसप्रीत बुमराहच्या येण्याने गोलंदाजीची धार वाढली आहे. वर्ल्ड कप आधी टीम इंडियाला आशिया कप जिंकण्याचं आव्हान असणार, आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असून टीम इंडियाचे सामने श्रीलंकेम ध्ये पार पडले जाणार आहेत. पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळमध्ये रंगणार असून या सामन्यापासून आशिया कपच्या थराराला सुरूवात होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular