एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी खउड ने जाहीर केले. या नव्या वेळापत्रकानुसार वर्ल्डकपमधील ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याचाही समावेश आहे. भारत-पाकिस्तान सामना नव्या वेळापत्रकानुसार १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याआधी हा सामना १४ ऑक्टोबरला होणार होता. तसेच भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्याची तारीखही बदलली आहे. भारत-नेदरलँड्स सामना १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
विशेष म्हणजे, जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असेल, त्यावेळी संपूर्ण देशात अनेक मोठे उत्सव होणार आहेत. याची सुरुवात नवरात्रीने होईल, त्यानंतर कालीपूजा आणि दसरा उत्सव येईल. याशिवाय दिवाळीचा उत्सवही असेल. टीम इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना आता दिवाळीच्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. पूर्वी हा सामना ११ नोव्हेंबर रोजी होणार होता.
विशेष म्हणजे, सहसा भारतीय संघाचे सामने कोणत्याही मोठ्या सणाच्या दिवशी आयोजित केले जात नाहीत आणि त्यात दिवाळीकडे विशेष लक्ष दिले जाते. यापूर्वी टीम इंडियाने ३६ वर्षांपूर्वी दिवाळीच्या दिवशी सामना खेळला होता. हा सामना १९८७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीच्या मैदानावर खेळला होता. टीम इंडियाने २२ ऑक्टोबरला खेळलेला हा सामना ५६ धावांनी जिंकला होता.