22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeSindhudurgकाजू बोंडूचा सोडा बनवण्याचे तंत्र विकसित

काजू बोंडूचा सोडा बनवण्याचे तंत्र विकसित

हे उत्पादन काजू बीपेक्षा सुमारे ६ ते ८ पट अधिक आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात वाया जाणाऱ्या काजूच्या बोंडूवर प्रक्रिया करण्याचे पुढचे पाऊल कोकण कृषी विद्यापीठाच्या येथील फळसंशोधन केंद्राने टाकले आहे. आता काजू बोंडूपासून सोडा बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात त्यांना यश आले आहे. भारत हा काजूचा उत्पादक, उपभोक्ता व जगातील काजू निर्यात क्षमता असलेला देश आहे. महाराष्ट्रात काजू पिकाखाली एकूण १.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून, काजू बीचे उत्पादन १.९७ लाख टन आहे. महाराष्ट्राची उत्पादकता ११४५ किलो प्रति हेक्टर आहे. काजू उत्पादकांनी मुख्यत्वे काजू बीच्या गुणवत्तेकडे व अधिक उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले असून, काजू बोंडूचे उत्पादन हे वाया जाते.

हे उत्पादन काजू बीपेक्षा सुमारे ६ ते ८ पट अधिक आहे; परंतु अल्पावधीत खराब होत असल्यामुळे ९० टक्के काजू बोंडू वाया जात आहे. काजू बोंडूला आरोग्याच्या दृष्टीने त्यातील जीवनसत्व व खनिज पदार्थामुळे संरक्षणात्मक अन्न म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. ते पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे परिपक्व बोंडाच्या काढणीनंतर अल्पावधीत खराब होऊ लागते. म्हणूनच वाया जाणाऱ्या काजू बोंडूचा व्यावसायिक पातळीवर वापर करून त्यापासून एखादा मूल्यवर्धित प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते.

या सर्व बाबींचा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीचा विचार करून कोकणातील वाया जाणाऱ्या काजू बोंडूपासून काजू सोडा तयार करण्याचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात विकसित करण्यात आले आहे. या सोडानिर्मितीसाठी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या पध्दतीप्रमाणे काजू बोंडूपासून सिरप तयार करून ४० मिली सिरप आणि १६० मिली कार्बोनेटेड थंड पाणी घेऊन ८० पीएसआय दाबाने कार्बोनेशन करण्याची शिफारस केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular