27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriतायक्वांदोमध्ये राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी आचरेकर हिला सुवर्ण पदक

तायक्वांदोमध्ये राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी आचरेकर हिला सुवर्ण पदक

रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत रत्नागिरी तालुका स्पोर्ट्स तायक्वांदो अकादमीच्या सहकार्याने एस आर के तायक्वांदो क्लब आयोजित १९ वी क्योरोगी व ७ वी पूमसे जिल्हा वरिष्ठ गट अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेचे ओम साई मित्रमंडळ, शिक्षक पथपेढीजवळ, साळवी स्टॉप, नाचणे लिंक रोड, रत्नागिरी येथे जेष्ठ उद्योजक किरण सामंत याच्या हस्ते उदघाटन पार पडले.

सदर स्पर्धेमध्ये लांजा तालुका तायक्वांदो अकॅडमीची सचिव व राष्ट्रीय खेळाडू म्हणून कामगिरी केलेली तेजस्विनी विरेंद्र आचरेकर हिने सुवर्ण पदक संपादन केले. तिला लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वी अतिशय दुर्मिळ असणारा हा खेळ आता मात्र प्रसिद्धीस येत आहे. अनेक विद्यार्थी आणि नागरिक या खेळाबद्दल जाणून घेण्यास उत्सुक दिसत आहेत.

या प्रसंगी जिल्हा तायक्वांदो संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तालुका अध्यक्ष राम कररा, रत्नागिरी तालुका सचिव शाहरुख शेख, जिल्हा संघटना सचिव लक्ष्मण कररा,  जिल्हा संघटना उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शासनाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त श्री शशांक घडशी, संगमेश्वर तालुका सचिव,  इंडिया तायक्वांदो अध्यक्ष श्री. नामदेव शिरगावकर तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेचे महासचिव श्री संदीप ओंबासे, तामचे सचिव मिलिंद पाठारे ताम कोषाध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, राज्य तांत्रिक व पंच कमिटी व सर्व पदाधिकारी यांनी तेजस्विनीला भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील स्पर्धा जी पालघर येथे होणार असून, होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धाकरीता रत्नागिरी जिल्ह्याचे संघातून तेजस्विनी प्रतिनिधीत्व करणार आहे. तिच्या पुढील कारकिर्दीसाठी उपस्थितांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES

Most Popular