सागरी महामार्गावरील राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील बस थांब्याच्या पुढे काही अंतरावर टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकासह ७ महिला गंभीर जखमी झाल्या. दुर्देवाने यातील एक महिलेचा मृत्यू झाला असून गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव शितल सोमा जाधव (रा. वाघ्रण, वय ६०) असे आहे. याप्रकरणी नाटे पोलिसांनी टेम्पोचालक संतोष आबा नाचणेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली. याविषयी अधिक वृत्त असे की, वाघ्रण येथून या महिलांना घेऊन हा टेम्पो बाकाळेकडे जात होता. या सर्व महिला या तेथील एका कोळंबी प्रकल्पावर कामासाठी जातात, दररोज सकाळी त्यांना या टेम्पोने नेऊन सायंकाळी परत आणून सोडले जाते. बुधवारीही सकाळी या महिला काम् ासाठी या टेम्पोने जात होत्या. दरम्यान चिरेखाण बस थांब्याच्या दरम्यान या टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो सुमारे शंभर ते दिडशे फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत फरफटत गेला व हा अपघात झाला.
महिलांसह मुलगी जखमी – या अपघातात टेम्पो चालकासह, टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातात टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच काही ग्राम स्थांनी जखमींना उपचारासाठी तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींची नावे – अन्य जखमींमध्ये सविता बबन जाधव (६०), शिल्पा शिवाजी आग्रे (६५), रंजना रविकांत राणे (४०), संतोष आबा नाचणेकर (३८), प्रज्ञा प्रकाश डिंगवकर (५०), वंदना वसंत जाधव (४०) या महिलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे सागरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदूतीने जखमींना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील अनेकांनी मदतीसाठीं जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक संतोष आंबा नाचणेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक पोलीस हेडकॉस्टेबल हुजरे आहेत.