25.8 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunमहामार्गावरील खड्ड्यांमुळे जनता हैराण पॅचवर्कचा उपाय करत तात्पुरता दिलासा

महामार्गावरील खड्ड्यांमुळे जनता हैराण पॅचवर्कचा उपाय करत तात्पुरता दिलासा

चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे.

चिपळूण शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. जुन्या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून ओरड होताच ठेकेदार कंपनीने महामार्गावरचे खड्डे डांबरखडीने भरण्यासाठी पॅचवर्कच्या कामाला सुरूवात केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. शहर हद्दीत या कामाने काही अंशी गती घेतली असली तरी काही ठिकाणचे काम अजूनही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या ठिकाणी जुनाच डांबरी रस्ता अस्तित्वात आहे.

बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालय परिसरापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या भागात वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात आले आहेत. हे रस्तेही काही ठिकाणी डौंरीच आहेत. रखडलेले महामार्गाचे काम आणि त्यातच महामार्गावरची वाहतूक यामुळे जुन्या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. काही भागात तर रस्त्याची पुरती दुर्दशाच झाली होती. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकही कमालीचे हैराण झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत असून त्यात अनेकजण जखमी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे चौपदरीकणाचे काम मार्गी लागवण्यापूर्वी किमान महामार्गावरचे खड्डे डांबराने बुजवून तो वाहतुकीसाठी सुस्थितीत करावा, अशी मागणी सातत्याने होत होती.

यावर लोकप्रतिनिधींनी देखिल आवाज उठवला होता. काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत महामार्ग चौपदरीकरणातील प्रलंबित कामे, कोसळलेला उड्डाणपूल, सर्व्हिस रोडची रूंदी वाढविणेसह रस्त्यावरील खड्डे भरण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार शेखर निकम यांनी दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रांत कार्यालयावर धडक देत या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेऊन ठेकेदार कंपनीने डांबराने पॅचिंग करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. चिपळूण शहर हद्दीत हे काम सुरू झाले असून वाहनधारकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular