27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunचिपळुणातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर

चिपळुणातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर

चिपळूणमधील परशुराम घाटात दरडीचा धोका कायम आहे. येथे डोंगरावर परशुराम गाव तर डोंगराच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी-ठाकूरवाडी आदिवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. काहीजण दिवसा घरी आणि रात्री जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेल्या निवारा केंद्रावर वस्ती करत आहेत. तीन गावामध्ये काही कुटुंबे तात्पुरती स्थलांतरित झाली असली तरी उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात दरडीचा धोका असलेल्या १३ ग्रामपंचायत परिसरातील ३६ वाड्यांमधील ३४१ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

यामध्ये पेढे कुभांरवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद- धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी, तिवडीतील राळेवाडी, उगवतवाडी, भटवाडी, रिक्टोली येथील इंदापूरवाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, देऊळवाडी, नांदिवसेमधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी, कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई-धनगरवाडी, धामनदी-धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खंड-धनगरवाडी, कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलिफा धनगरवाडी, कोळकेवाडीमधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी, पिंपळी बुद्रुक, कुंभार्ली येथील लांबेवाडी, पेढांबेतील दाभाडी, रिंगी धनगरवाडी, येगाव येथील ढोकबाव सुतारवाडी, कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्धवाडी व मोहल्ला अशा गावांचा समावेश आहे.

येथील लोकांचे तात्पुरते पुनर्वसन होण्यासाठी ग्रामीण भागात जि. प. शाळा व काही समाज मंदिरांमध्ये २६ निवाराकेंद्रे उभारली आहेत; परंतु एक – दोन गावांमध्येच स्थलांतरची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी संभाव्य धोका आहे अशा ठिकाणी जाऊन अधिकारी स्थानिकांना स्थलांतरित होण्यासाठी समजूत घालत आहेत; परंतु तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर होण्यास कोणीच तयार नसल्याचे देखील समोर येत आहे. चिपळूणमधील परशुराम घाटात दरडीचा धोका कायम आहे. येथे डोंगरावर परशुराम गाव तर डोंगराच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे. २०२१ ला अतिवृष्टीमुळे पेढे गावातील काही घरावर दरड कोसळली होती. त्यामध्ये तिघांचा मृत्यूदेखील झाला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती आहे. त्याचे सर्वेक्षणदेखील प्रशासनाकडून करण्यात आले असून, स्थानिकांना स्थलांतराच्या नोटिसादेखील देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular