भारतात टेनिस या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारी अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने इतक्यातच निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत झालेल्या पराभवानंतर लगेचच सानियाने तिच्या निवृत्तीच्या घोषणा केली. २०२२ हा माझा शेवटचा हंगाम असेल, आणि तो मला पूर्ण करायचा आहे असे सानियाने सांगितले. मी ठरवलय हा माझा शेवटचा सीजन असेल’, असे सानियाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलामीच्या लढतीतच काजा ज्युवान आणि तामारा या स्लोव्हेनियाच्या जोडीने मिर्झा आणि किचीनॉक जोडीचा दारूण पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी झालेल्या सानिया मिर्झाला बुधवारी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सानियाने थेट आपल्या निवृत्तीची घोषणा केली. पराभवानंतर बोलताना सानिया मिर्झा म्हणाली, हा आपला अखेरचा हंगाम असेल, मी प्रत्येक आठवड्याला पुढची तयारी करत आहे. मी पूर्ण हंगाम खेळू शकेल याची निश्चितता देता येणार नाही,” असं सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार युक्रेनची नादिया किचनोक यांना पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. दरम्यान सानिया मिर्झा आता या अमेरिकेच्या राजीव रामसह स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत सहभागी होणार आहे. सामन्यानंतर सानिया मिर्झाने सांगितले कि, मी खेळ चांगला करू शकते, असं मला वाटतं; पण आता शरीर पूर्वीसारखं तेवढ साथ देत नाही. सानिया मिर्झा २००३ पासून आंतरराष्ट्रीय टेनिस सामने खेळत असून, तब्बल दोन दशकानंतर टेनिटमधून संन्यास घेणार आहे.
३५ वर्षीय सानिया मिर्झा कायमच भारताची लोकप्रिय टेनिस खेळाडू राहिली आहे. सानिया मिर्झाने आतापर्यंतच्या कारकीर्दीत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. सानिया मिर्झाने आपल्या कामगिरीतून उदयोन्मुख खेळाडूंनाही प्रेरणा दिली. आपल्या खेळाबरोबरच सानिया मिर्झा तिचे कपडे, लुक्स, स्टाइल, सोबतच इतर गोष्टींमुळे चर्चेत राहिली. त्यामध्ये मुख्य म्हणजे तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे सानियाला विविध प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.