26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainment‘द कश्मीर फाईल्स’ एक वास्तववादी चित्रण

‘द कश्मीर फाईल्स’ एक वास्तववादी चित्रण

महिला हात जोडताना दिसते. ती ढसाढसा रडते. विवेक अग्निहोत्रीला म्हणते, तुझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही.

‘द कश्मीर फाईल्स’  हा गेल्या काही दशकांतील असा पहिलाच चित्रपट असावा,  जो प्रेक्षकांनी केवळ पाहिला नाही तर तो अनुभवलादेखील आहे. एक महिला चित्रपट हॉलमधून बाहेर पडल्यानंतर दिग्दर्शक अग्निहोत्रीच्या पाया पडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अग्निहोत्रीने त्यांना अभिवादन केले. याचवेळी महिला हात जोडताना दिसते. ती ढसाढसा रडते. विवेक अग्निहोत्रीला म्हणते, तुझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही. अशाच प्रकारे आमच्या काकांची हत्या झाली. आम्ही हे सर्व पाहिले आहे.” हा व्हिडिओ व्हायरल होत आहे,  स्वत: अग्निहोत्री यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.

असाच आणखी एक व्हिडिओ विवेक रंजनने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की,  टूटे हुए लोग बोलते नहीं उन्हें सुना जाता है. ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल ते द काश्मीर फाइल्स या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातून काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराचे दारुण आणि वास्तववादी चित्रण प्रेक्षकांसमोर मांडले आहे.

चित्रपटातील प्रत्येक दृश्य आणि संवाद प्रत्येक प्रेक्षकाला जागेवर खिळवून ठेवतात. ज्या लोकांच्या कुटुंबात ही घटना घडली आहे, ते त्यांचा भूतकाळ या चित्रपटातून प्रतिबिंबित होताना दिसला. त्यामुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले. असा एकही प्रेक्षक नसेल ज्याचे डोळे भरून आले नसतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील “द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट सध्या देशात खूपच चर्चेमध्ये आहे. चित्रपटा बद्दल बोलताना ते म्हणाले, सत्य दीर्घकाळ लपविण्याचा प्रयत्न केला ते समोर आणले जात आहे. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला ते आज निषेध करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. अशाच प्रकारचे सत्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करावी.

RELATED ARTICLES

Most Popular