27.7 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeCareerठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पदभरती

ठाणे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत पदभरती

ठाण्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत प्रशिक्षण प्रभारी (Training In Charge), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) ही पदे भरली जाणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत  राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती केली जात असते. यावेळेस ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

ठाण्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत प्रशिक्षण प्रभारी (Training In Charge), प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) ही पदे भरली जाणार आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार ते ६० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदे कंत्राटी स्वरुपाची असणार आहेत. तसेच निवृत्त उमेदवार देखील यासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम/ एमकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

ट्रेनिंग इनचार्ज या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ट्रेनिंग इनचार्ज पदाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

ट्रेनिंग इनचार्ज आणि अॅडमिनिस्ट्रेटीव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे, गणेश उद्यानासमोर, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार या पत्त्यावर पाठवायचा आहे. २६ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular