24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriत्या व्हेल माशाचा मृत्यू उपासमारीमुळे

त्या व्हेल माशाचा मृत्यू उपासमारीमुळे

ओहोटी असल्याने मृत व्हेल मासा किनाऱ्यावर दिसत होता.

गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर वाचविण्याचे प्रयत्न करून समुद्रात लोटलेला व्हेल मासा बुधवारी मृतावस्थेत गणपतीपुळे मालगुंड खाडीकिनारी लागला. ओहोटीनंतर गुरुवारी दुपारी गोव्यातील एजन्सीकडून माशाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. व्हेलच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उपासमारीने मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज आहे. व्हेल माशाचे (ब्ल्यू व्हेल) ते पाच-सहा महिन्यांचे पिल्लू होते. तीस फूट लांब आणि सुमारे ४ टन त्याचे वजन होते. हे पिल्लू सोमवारी सकाळी गणपतीपुळे किनाऱ्यावर आले. शेकडो हातांनी तब्बल ४२ तास प्रयत्न करून त्याला जीवंत ठेवले.

ओहोटीच्यावेळी त्याच्यावर सातत्याने पाणी ओतण्यात आले. आठ तास सलाइन लावण्यात आले आणि ४२ तासांनी ते सुखरूप खोल समुद्रात गेले. परंतु काल सायंकाळी किनाऱ्यावर ते मृतावस्थेत दिसून आले. संध्याकाळी पाचच्या सुमारास हा मासा पुन्हा मृतावस्थेत किनाऱ्यावर लागला. पण समुद्राला भरती असल्याने काहीच करता येत नव्हते. या दरम्यान वन विभागाच्या रत्नागिरी परिक्षत्र वन अधिकारी राजेश्री कीर व त्यांच्या टीमने गोव्याच्या एजन्सीशी संपर्क साधला. सायंकाळी ही टीम घटनास्थळी दाखल झाली. ओहोटी असल्याने मृत व्हेल मासा किनाऱ्यावर दिसत होता. तिथेच या टीमद्वारे त्याचे शवविच्छेदन केले.

RELATED ARTICLES

Most Popular