27.5 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

iPhone 16 मालिका विक्री सुरू, 5000 रुपयांची झटपट सूट…

Apple iPhone 16 मालिका अधिकृतपणे आजपासून म्हणजेच...

ऋषभ पंतने एमएस धोनीला बांगलादेशविरुद्ध केलेल्या कारवाईची आठवण करून दिली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना...
HomeMaharashtraसिलेंडर वाढवला, वीज बिल वाढवता, माती खायची का? महिलेच्या सवालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष...

सिलेंडर वाढवला, वीज बिल वाढवता, माती खायची का? महिलेच्या सवालानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष निरुत्तर

महिलेच्या या रणरागिणी अवतारानंतर बावनकुळे यांनी माईक खाली केला आणि तुम्ही स्टेजवर चला असे म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा जनतेने चकवा दिला आहे. तुम्हाला भावी पंतप्रधान म्हणून कोण आवडेल? असा सवाल विचारत ते संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत आहेत. एका महिलेच्या समोर माईक पुढे करत त्यांनी सवाल केला तेव्हा त्या महिलेने सांगितले, सरकार वीजेचे बिल वाढवून देते, सिलेंडर वाढवून देते, आम्हाला कामधंदे नाहीत, माती खायची का? महिलेच्या या रणरागिणी अवतारानंतर बावनकुळे यांनी माईक खाली केला आणि तुम्ही स्टेजवर चला असे म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

एकंदर काय, कोकण असो वा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा काही रोखठोक मते मांडणारी मंडळी बावनकुळेंना भेटली. नुकत्याच प्रदेशाध्यक्षांनी रायगडसह तळकोकणाचा दौरा केला होता. त्यावेळी हाच सवाल बावनकुळे यांनी केला होता. तुमच्या मनातील पंतप्रधान कोण? असे त्यांनी एका दुकानदाराला विचारले होते. तेव्हा तरुण दुकानदार म्हणाला होता, ‘राहुल गांधी!’ या उत्तरानंतर बावनकुळेंची फजिती झाली होती. आता वर्धा शहरातही पुन्हा बावनकुळे यांना याचा प्रत्यय आला आहे..

संकल्प समर्थन यात्रा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. विविध ठिकाणी जात ते नागरिकांशी संवाद साधत । आहेत. बावनकुळे या अभियानाअंतर्गत वर्धात पोहोचले होते आणि त्यांनी काही महिलांना प्रश्न केले, त्यावेळी महिलांनी त्यांना उत्तर देताना बावनकुळे यांची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं. वर्ध्यात भाजपकडून संकल्प ते समर्थन या अभियांनाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धा शहराच्या वर्दळीच्या परिसरातील असलेल्या साई मंदिर ते अंबिका चौकपर्यंत यात्रेदरम्यान एका महिलेला २०२४ मध्ये कोण देशाचे पंतप्रधान पाहिजे असे विचारले? यावेळी वर्ध्यातील महिला चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या, याचा व्हिडीओ ‘सध्या समोर सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

माती खायची का? – ‘सरकार विजेचे बिल वाढवून देते,सिलिंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाहीत, माती खायची का? असा संतप्त सवाल या महिलेने बावनकुळे यांना केला आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरबावनकुळेयांनीमाईकबाजूला करत महिलेचं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न केला. पुढे त्या महिलेला, ‘तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू’, अशी विनंती बावनकुळे यांनी केली. त्यावर महिला आणखी संतापली आणि ‘स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला?’ अशीच चर्चा यावेळी महिलांमध्ये रंगली होती. या अभियानात बावनकुळे स्वतः नागरिकांच्या भावना जाणून घेत होते. पण एका सर्वासामान्य महिलेने बावनकुळे यांच्या प्रश्नावर संताप व्यक्त केल्यामुळे हा विषय सर्वत्र चर्चेत आला आहे.

रत्नागिरीतही तरुणाने दिले होते अस्खलीत उत्तर – रत्नागिरीमध्येही त्यांनी रस्त्यावर उतरुन जनतेशी, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी, काहींना आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होईल, असा प्रश्न केला. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान कोण व्हावं, असं तुम्हाल वाटतं, असा सवाल बावनकुळे यांनी केला होता. त्यावर, एका युवकाने राहुल गांधींचं नाव घेतलं. तरुणाने राहुल गांधींचं नाव घेतल्याने  भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले. त्यावेळी, त्यांनी शांतपणे प्रतिक्रिया देत, ४५० पैकी एकजण राहुल गांधींच्या पसंतीचा आहे, असे म्हणत त्या युवकाचे धन्यवाद मानले. मात्र, या तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला होता.

RELATED ARTICLES

Most Popular