22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiri…त्या युवतीवर अत्याचार झालाच नाही, गैरसमजुतीतून तक्रार

…त्या युवतीवर अत्याचार झालाच नाही, गैरसमजुतीतून तक्रार

या घटनेमुळे संपूर्ण शहर आणि जिल्हा हादरला.

संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या चंपक मैदानावरील युवतीवरील अत्याचार प्रकरणाला कलाटणी देणारा खुलासा पोलिसांनी केला आहे. सखोल तपास, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवालावरून आणि तक्रारदार युवतीला असलेल्या आरोग्यविषयक समस्येतून युवतीने केवळ तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले असावेत, असा गैरसमज करून घेऊन गैरसमजुतीतून तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी न्यायालयाला याबाबत अहवाल सादर केला. यामुळे थेट पोलिस यंत्रणेकडे बोट दाखवले जात होते. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला आहे, हे जनतेसमोर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी तांत्रिक गोष्टी व इतर ठोस पुरावे गोळा करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. २६ ऑगस्टला युवतीने तिच्यावर चंपक मैदान येथे अत्याचार झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर आणि जिल्हा हादरला. मोठ्या संख्येने नागरिक जिल्हा रुग्णालयात गोळा झाले.

कारवाईबाबत घोषणाबाजी सुरू झाली. रास्ता रोको झाले. बारा तास हे ताणतणावाचे वातावरण होते. महिला असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते; परंतु पोलिसदलाने आज सत्य पुढे आणले. त्या युवतीच्या तक्रारीनंतर शहर पोलिस ठाण्यात कलम गुन्ह्याची नोंद केली. या गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी लगेच ४. पोलिस अधिकारी व ७ अंमलदार यांचे एक विशेष तपास पथक गठित करून तपास करण्याचे आदेश दिले. या दरम्यान युवतीची जिल्हा रुग्णालयात गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण वैद्यकीय तपासणी करून नमुने घेण्यात आले. ते कोल्हापूर न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण २६ साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आली व जबाब नोंदवण्यात आले. रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याआधारे तपास करण्यात आला. या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी या युवतीला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूसही करण्यात आली. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल यात महत्त्वाचा ठरला. तो १८ ऑक्टोबरला प्राप्त झाला. या अहवालामध्ये युवतीने दिलेल्या फिर्यादीमधील हकिकतीला पुष्टी देणारी माहिती नमूद नाही. पोलिसांनी सखोल तपास करून या प्रकरणातील सत्य समाजासमोर आणले. त्याबद्दल पोलिसांचे कौतक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular