चिपळूण शहरातील अनेक विभागतील विकासकामांच्या काम यासाठी रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ३.२५ कोटीचा निधी दिला आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी प्राप्त झाला आहे.शहरातील खंड, पेठमाप, उक्ताड आणि बाजारपेठ विभागाला भरघोस निधी मिळाला आहे, अशी माहिती शहरप्रमुख मोहंमद फकीर यांनी दिली माहिती. यावेळी त्यांच्यासोबत शहर समन्वयक अंकुश आवले उपस्थित होते. शहरातील अंतर्गत कामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने पालकमंत्री ना. उदय सामंत आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.