27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeRajapurमहामार्गाचं काम अपूर्ण, मात्र राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर टोलवसुली सुरू

महामार्गाचं काम अपूर्ण, मात्र राजापुरातील हातिवले टोलनाक्यावर टोलवसुली सुरू

मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जातो. पण महामार्गाचं काम बाकी असलं तरी आता टोला नाका सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. पण राजापूर तालुक्यातील टोल नाका आज म्हणजेच ११ एप्रिल मंगळवारी सकाळी सातपासून सुरू करण्यात आला. या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे.

टोला नाका सुरू करण्याचा हा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी व नागरिकांनी हाणून पडला होता. आणि महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते व नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे आता आजपासून सुरू होणाऱ्या टोल नाक्याकडे सगळ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे. हातिविले टोल नाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता आजपासून महामार्गावरती राजापूर हातिवले येथे टोल वसुली सुरू होईल, हे जवळपास निश्चित आहे.

कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टप्प्यातील जवळपास ९८.२ टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता अतुल शिवनिवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका राजापूर हातिवले येथे सुरू होणार आहे. यापूर्वी २२ डिसेंबरला हा टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती. अनेक विषय बाकी आहेत, या टोल नाक्यापासून सहाशे मीटर अंतरावर काम सुरू आहे पाणी योजना विषय आहे. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू होणार नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरू का? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी करण्यात आले होते. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हातीवले येथील टोल वसूलीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने हातीविले टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular