25.8 C
Ratnagiri
Sunday, September 15, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeRatnagiriवाचवा..कार दरीत पडलीय, मध्यरात्री २ वाजता फोन, पोलिसांनी चक्र फिरवली,चिमुकलीसह दाम्पत्याला जीवदान

वाचवा..कार दरीत पडलीय, मध्यरात्री २ वाजता फोन, पोलिसांनी चक्र फिरवली,चिमुकलीसह दाम्पत्याला जीवदान

मध्यरात्रीच्या भयाण अंधारात साखरप्याजवळ मुरडी घाट उतरताना मढवळ कुटुंबियांची मोटर खोल दरीत कोसळली आणि फार मोठे संकट कुटुंबावर ओढवले. या कारमध्ये मढवळ पती-पत्नीसह त्यांची ४ वर्षांची चिमुरडी मुलगी प्रवास करत होती. मध्यरात्रीनंतर खोल दरीत कोसळल्या नंतर आतां मदतीला येणार तरी कोण? असा प्रश्न पडला होता. काळोखात दरीत कोसळल्या नंतर जगण्याची आशा मढवळ कुटुंबीयांनी सोडली होती. मात्र प्रयत्न सोडले नाहीत. बराच प्रयत्न केल्यानंतर त्यांना पोलिसांना फोन लावण्यात यश आले. शनिवारी मध्यरात्री २ वाजता सिद्धी मढवळ यांनी ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागितली. अवघ्या १५ मिनिटात पोलिसांनी घटनास्थळी पोचून या तिघांनाही वाचवले. देवरूख पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.असे घडले याबाबतची माहिती अशी की, देवरूख पोलिसांना ८ एप्रिलला रात्री २ वाजून ९ मिनिटांनी सिद्धी मढवळ यांचा ११२ क्रमांकावर फोन आला. आमचा अपघात झाला असून आम्हाला तत्काळ मदत हवी आहे, असे त्यांनी फोनवरून कळविले. यावेळी पोलिस ठाण्यात राहूल गायकवाड होते. ते सहकाऱ्यासह १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

कार दरीत कोसळली:- विनायक मढवळ (वय ३३), पत्नी सिद्धी मढवळ (वय ३२), मुलगी मीरा (वय ४, सर्व रा. कोल्हापूर) हे मोटारीने खेड येथून कोल्हापूरला गावी निघाले होते. साखरप्यापासून पुढे २ कि.मी. अंतरावर मुरडे घाट उतरत असताना समोरून आलेल्या मोटारीच्या वाहनांचा प्रखर प्रकाश डोळ्यावर पडल्याने विनायक यांना समोरील रस्ता दिसला नाही आणि काही कळायच्या आत गाडी १०० फूट खोल दरीत कोसळली. दैव बलवत्तर म्हणून गाडी सरळ खाली गेली. मात्र सर्वत्र अंधार, चारी बाजूला मोठमोठे दगड होते. त्यातही न घाबरता सिद्धी मढवळ यांनी सर्व नातेवाईक, मैत्रीणी यांना मोबाईलवरून लोकेशन पाठविले. रात्री २ वाजता कोण मदत करणार? या चिंतेत असताना त्यांनी ११२ या हेल्पलाइनवर फोन केला:

पोलिसांची तत्परता:- समोरून तत्काळ प्रतिसाद मिळाला. पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत नागवेकर, चालक पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील १५ मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. दोरीच्या सहाय्याने खाली दरीत उतरून गाडीची डिकी उघडून प्रथम मुलगी मीरा हिला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर विनायक व सिद्धी यांना बाहेर काढून सुखरूप वर आणले. देवरूख पोलिसांच्या या मदतीमुळे मढवळ दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रू आले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

RELATED ARTICLES

Most Popular