25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeChiplunटेरव ग्रामस्थांच्या उपोषणाची तीव्रता वाढली आ.शेखर निकमांनी घेतली भेट

टेरव ग्रामस्थांच्या उपोषणाची तीव्रता वाढली आ.शेखर निकमांनी घेतली भेट

टोरवमधील जलजीवन मिशन संदर्भात अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर झाला आहे.

जिल्हा परिषद प्रशासनात एक वाक्यता नसल्याने उपोषणकर्त्यांना अपेक्षित उत्तरे आणि अपेक्षित कागदपत्रांबाबत ठोस कारवाई होत नसल्यानेच उपोषण अधिक तीव्र होऊ लागले आहे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी संबंधित यंत्रणांना चांगलेच पेचात पकडले असल्याने प्रशासन विचलित झाले आहे. तर गुरुवारी आ. शेखर निकम यांनीही उपोषणस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तात्काळ कागदपत्रे उपोषणकर्त्यांना देण्याचा आदेश दिला आहे टेरव ग्रामस्थांचे आपल्या विविध मागण्यासाठी १५ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू आहे.

तर सोमवार पासून शिवसेना तालुकाप्रमुख आणि वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला वठणीवर आणणारे संदीप सावंत यांनी थेट उपोषणात उतरून आम रण उपोषण सुरू केल्याने आंदोलनाची तीव्रता आता वाढली आहे. टोरवमधील जलजीवन मिशन संदर्भात अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर झाला आहे. मात्र जिल्हा परिषदेने अजूनही कोणतीही कारवाई केलेली नाही. तर बांधकामांसंदर्भात आवश्यक असणारी माहिती अजूनही मिळालेली नाही. गुरुवारी आ. शेखर निकम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपोषणकर्ते आणि संदीप सावंत यांच्याजवळ चर्चा केली.

आ. निकम यांच्यासमोर संदीप सावंत यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याजवळ चर्चा करून उपोषणकर्त्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे देण्याचे सूचित केले तर गटविकास अधिकाऱ्यांना उपोषणकर्त्याच्या मागणी नुसार ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामाचे प्रस्ताव प्रत देण्याचे आदेश देत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तर संबंधित कामाची अन्य तालुकातील अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उपोषणस्थळी गुरुवारी भजनाचा जोर होता. भजन आणि घोषणांनी पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाळे आदींनी भेट दिली.

RELATED ARTICLES

Most Popular