बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात ९८ व्या वर्षी निधन झाले. गेले अनेक महिने त्यांची तब्येत बिघडली होती. आज त्यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. २९ जून रोजी श्वसनाच्या होत असलेल्या त्रासामुळे दिलीप कुमार यांना मुंबईमधील प्रसिद्ध हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही समोर आली होती. परंतु, आज प्रकृती अस्वास्थामुळे सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला होता. हिंदी सिनेसृष्टीत यांना ट्रॅजिडी किंग नावानेही ओळखलं जात असत. हिंदी सिनेसृष्टीच्या आपल्या कारकिर्दीमध्ये दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका निभावल्या. कर्मा सिनेमामधील त्यांची भूमिका अजरामर राहिली. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या चित्रपटामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका वठवल्या. अनेक काळ त्यांनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये गाजवला. ज्वारभाटा हा १९४४ साली प्रदर्शित झालेला दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर किला हा त्यांचा १९९८ साली प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला आहे.
गेले काही महिने प्रकृती अस्थैर्याने जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांची पत्नी सावली सारखी त्यांच्या सोबत होती. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनामुळे त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचे निधन झाले. श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामुळे मुंबई खारमधील हिंदूजा रुग्णालयात त्यांना दाखल केले गेले. एका लहान ऑपरेशन करून दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांतील साठलेलं पाणी काढण्यात आले होते. आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ११ जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले होते. असे अजरामर अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने सर्व सिनेसृष्टी शोकाकुल झाली आहे, अनेक दिग्गजांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.