दापोलीत बुधवारी पहाटे तापमान अचानक ७.२ अंशापर्यंत घसरल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. परिणामी पहाटे परिसरात प्रचंड थंडीचा अनुभव आला. अनेकांना यामुळे हुडहुडी भरली. या अचानक तापमान घसरणीमुळे स्थानिक लोकांना पांघरुण आणि उबदार कपड्यांची आवश्यकता भासू लागली आहे. सहसा किनारपट्टी भागात अशा थंडीची शक्यता कमी असली तरी सध्याचे थंड हवामान आणि गारठा अगदी अप्रत्याशित ठरला. तसेच, हवामान अंदाज पाहता पुढील ३-४ दिवस या थंड हवामानाची लाट महाराष्ट्रात कायम राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने संकेत दिले आहेत.
स्थानिक प्रशासनाने व हवामान विभागाने नागरिकांना सकाळ-रात्रीचे वेळ, विशेषतः लहान मुले, व वृद्धवयीन ‘लोक यांना पांघरुण, गरम पाणी व गरजेचे आरोग्याचे उपाय वापरण्याची सूचना केली आहे. परिसरात असलेल्या सर्वांनी सावधानता घ्यावी आणि थंडीपासून बचावासाठी योग्य तयारी ठेवावी. कारण अशा अचानक तापम ानात होणाऱ्या बदलामुळे आरोग्यावर ताण पडण्याची शक्यता आहे असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.

