28.5 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeMaharashtraअशी ही लपवाछपवी! शरद पवारांच्या भेटीला आलेल्या आमदाराने चेहरा झाकला

अशी ही लपवाछपवी! शरद पवारांच्या भेटीला आलेल्या आमदाराने चेहरा झाकला

या लपवाछपवीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत. काहीजण जाहीरपणे आपल्या नेत्याला भेटत आहेत, तर काहीजण गुपचूपपणे भेट घेत आहेत. विशेषतः पक्षांतरासाठी येणारे नेते लपतछपत येत असून माध्यमांच्या कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा कटाक्षाने प्रयत्न करत आहेत. आज भाजपाचे एक आमदार शरद पवार यांना भेटण्यासाठी आले असता माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून त्यांनी सुरुवातीला चेहऱ्यावर असलेला मास्क तात्काळ ओढला. त्यानंतर गाडी माघारी वळवत काढता पाय घेतला. या लपवाछपवीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून मागील काही दिवसांत महायुतीच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक नेता फाईलने चेहरा लपवून शरद पवारांकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत देण्यास पोहोचला होता. त्यानंतर आता भाजपच्याही एका आमदाराबाबत काहीसा असाच किस्सां घडला आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील हे शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसरात आले होते.

मात्र, तिथे माध्यमांचे कॅमेरे पाहताच कारमध्ये मास्क घालून बसलेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी माध्यमांची नजर चुकवण्याचा प्रयत्न केला. चालकाला तिथून गाडी काढण्यास सांगितले आणि ते निघून गेले. रणजीतसिंह मोहिते पाटील हे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भातच चर्चा करण्यासाठी शुक्रवारी ते पवार यांना भेटण्यास जात होते, असे समजते. दरम्यान, रणजीतसिंह मोहिते पाटील हे लवकरच आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. याबाबत आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular