29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriरत्नागिरीतील सेक्स रॅकेटचे जाळे साऱ्या जिल्ह्यात पसरले…

रत्नागिरीतील सेक्स रॅकेटचे जाळे साऱ्या जिल्ह्यात पसरले…

तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या असून आता ही यादी २५० पर्यंत पोहोचली असून यामध्ये काही पुढारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रत्नागिरीत उघडकीस आलेल्या वेश्या व्यवसायाचे जाळे केवळ शहरापुरतेच नसून त्याची पाळेमुळे जिल्हाभर पसरली असल्याची धक्कादायक माहिती हळूहळू तपासात उघड होत असून याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींनी ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्वावर महिलांची एक साखळीच तयार केल्याचे कळते आहे. या सेक्स रॅकेटशी संबंध असणाऱ्या १५० लोकांची यादी सुरूवातीला पोलिसांच्या हाती लागली होती. तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे आल्या असून आता ही यादी २५० पर्यंत पोहोचली असून यामध्ये काही पुढारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शहरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर या व्यवसायाचे धागेदोरे किती खोलवर रुजले आहेत याची माहिती दरदिवशी पुढे येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात १० जणांना अटक झाली असून महत्वाचे चेहरे मात्र अटकेपासून अद्याप दूर आहेत. या व्यवसायासाठी पुरवठा करणाऱ्यांची टीम वेगळी असून ग्राहक शोधणारी टीम वेगळी असल्याची माहिती आता पुढे आली आहे. तसेच ज्या महिलांना या व्यवसायात देहविक्रीसाठी आणले होते या महिलांची मोठी साखळी तयार करण्यात आल्याचे तपासात पुढे येत आहे.

आणखी ३ महिला? – रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कारवाई झाल्यानंतर आतापर्यंत दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर एकीला रविवारी अटक करण्यात आली. रविवारी अटक केलेल्या संशयितांकडून चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आणखी ३ महिला यात अडकण्याची शक्यता असून पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.

यादी २५० वर – सुरुवातीला १५० जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली होती. जसजसा तपास सुरू झाला तसतशी ही यादी दरदिवशी वाढू लागली आहे. सोमवारी दुपारपर्यंत यादीतील नावांची संख्या २५० वर जावून पोहोचली होती. यामध्ये शहरातील अनेक बडी धेंडे असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी सावधगिरी बाळगून तपासाची चक्रे फिरवली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे जातीनिशी तपासकामावर लक्ष ठेवून आहेत.

ते पुढारी कोण? – वेश्या व्यवसायाची मोठी साखळी निर्माण झाली असून काही पुढाऱ्यांचा त्याला वरदहस्त होता असे बोलले जाते. त्या बदल्यात काही पुढाऱ्यांना दर्जेदार ‘माल’ पुरवला जात होता, अशी माहितीदेखील तपासात आता पुढे येऊ लागली आहे. ते पुढारी कोण? याबाबत चर्चा सुरू असताना पोलिसांनी मात्र गुप्तता बाळगली आहे.

अधिकारी पण… – वासनेची भूक भागवण्यासाठी अनेकजण या साखळीत अडकले गेले. सर्वसामान्यांबरोबर पुढारी आणि अधिकारी पण या प्रकरणात असल्याची माहिती तपासात पुढे आल्याचे समजते. या सर्वांची स्वतंत्र यादीच पोलिसांनी तयार केल्याची चर्चा असून पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य ग्राहक आणि पुरवठादार यांचा समावेश असून दुसऱ्या यादीत पुढारी आणि अधिकारी यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

ओळखीतून महिलांची साखळी – सुरूवातीला ओळखीतील एक-दोन महिलांच्या सहाय्याने हा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू होता आणि बघताबघता त्याची व्याप्ती वाढतच गेली. सुरूवातीला ज्या एक- दोन महिला कार्यरत होत्या त्यांच्याच ओळखीतून काही महिला आणि तरूणी यांना या व्यवसायात ओढण्यात आले आणि देहविक्री करणाऱ्या महिलांची साखळी वाढतच गेली, अशी चर्चा सुरू आहे.

जणूकाही रेड लाईट एरिया? – दरदिवशी नवीन नावे पुढे येत असताना या प्रकरणात काही महिला अग्रेसर होत्या. जणूकाही रत्नागिरीत रेड लाईट एरियाच सुरू झाल्याचा संदेश त्यांच्याकडून दिला जात होता, अशी संतप्त चर्चा शहरात सुरू असून पोलिसांनी त्याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे. उच्चभ्रू वस्तीत हा सारा प्रकार सुरू असल्याने सुरूवातीला कोणाला संशय आला नाही. मात्र दरदिवशी नवीन नवीन चेहरे एकाच इमारतीत पहायला मिळू लागल्याने साऱ्याचा भांडाफोड झाला, असे बोलले जात आहे.

जिल्हा परिषदेत वेगळीच चर्चा – ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत या प्रकरणावरून सध्या वेगळी चर्चा सुरू आहे. हा की तो… याबाबत काहींचे एकमत होत नसल्याने आठ दिवसांपासून रजेवर गेलेल्या तसेच नेहमीच बोलके पोपट म्हणून वावरणाऱ्यांच्या तोंडाला कुलूप लागल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्हाभरात व्यवसायाचे कनेक्शन – मर्यादित व्यवसाय सुरू होता. कालांतराने या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यात आली आणि संपूर्ण जिल्ह्यात त्याची पाळेमुळे रोवली. गेली. काही तालुक्यातील ग्राहक आणि सप्लायर यांची नावेदेखील पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टीने पोलिसांनी. तपासाची चक्रे फिरवली आहेत.

मागणीनुसार पुरवठा – देहविक्रीसाठी महिलांची साखळी तयार करण्यात आली होती त्यामध्ये परिस्थितीने गांजलेल्या. तरूणींचादेखील समावेश असून ग्राहकाच्या मागणीनुसार पुरवठा केला. जात होता, अशीदेखील माहिती पुढे येऊ लागली आहे. पोलिसांनी आजवर. केलेल्या कारवाईबाबत शहरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular