22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedखेडच्या रखडलेल्या खांबतळ्याचे आता रूप पालटणार, आ. योगेश कदम

खेडच्या रखडलेल्या खांबतळ्याचे आता रूप पालटणार, आ. योगेश कदम

माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता.

निधी अभावी ८ वर्षांपासून रखडलेल्या खांबतळ्याचे लवकरच रूपडे पालटणार आहे. खेड शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या व बारमाही पाण्याने भरलेल्या खांबतळ्याच्या सुशोभिकरणासाठी माजी पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने १ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या ८ वर्षांपासून रखडलेल्या खांबतळ्याच्या सुशोभिकरणासाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील अडीच कोटींचा निधीही प्राप्त झाला होता. सुशोभिकरण कामास प्रारंभ झाल्यानंतर काही महिन्यातच कामात खोडा पडला.

हाकेच्या अंतरावर हे खांबतळे आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालणारे स्थळ म्हणून खांबतळ्याकडे पाहिले जाते. या खांबतळ्यानजीक शिवशंकराचे पुरातन मंदिरही आहे. लगतच जिजामाता उद्यानही असल्याने शोभेच्या दृष्टीने हे खांबतळे लक्षवेधी ठरले आहे. जिजामाता उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. यामुळे खांबतळे शहराचे ऐतिहासिक वैभव ठरले आहे. कित्येक वर्षांपूर्वी खांबतळ्याला जलपर्णीने दिलेल्या वेढ्यामुळे खांबतळे विद्रुप झाले होते. खांबतळ्याच्या घेतला. सुशोभिकरणासाठी काही वर्षांपूर्वी २ कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्तावही पाठवण्यात आला होता. मात्र हा प्रस्तावही लालफितीत अडकला होता.

खांबतळ्याचे रूपडे पालटण्यासाठी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पुढाकार घेतला होता. २०१५-१६ मध्ये पहिल्या टप्यात २ कोटी रूपयांचा निधी ४४ लाख ६५ हजार २५० रूपयांचा निधीही नगर परिषदेला उपलब्ध करून दिला होता. मात्र निधी आणण्याच्या श्रेयवादात काहीपक्षांनी घेतली उडी होती. नारळही फोडण्यात आले मात्र काही महिन्यातच सुशोभिकरणाच्या कामात खोडा पडून काम पुरते रखडले होते. यानंतर नगर प्रशासनाने ७ कोटी ८४ लाख रूपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. आ. योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने निधीसाठी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular