20.7 C
Ratnagiri
Wednesday, January 28, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeRatnagiriजिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा महिनाभरात होणार दूर

जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा महिनाभरात होणार दूर

शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी ५ कोटी रुपये मंजूर केले.

जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा आता दूर होणार आहे. जिल्हा नियोजनमधील साडे चार कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाला औषध खरेदीसाठी वर्ग करण्यात आले आहेत. याची निविदा काढून औषध खरेदीची प्रक्रिया महिन्यात पूर्ण केली होणार आहे. त्यामुळे भविष्यात औषध तुटवड्याची चिंता राहणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाला गेल्या दोन वर्षांमध्ये एक रुपयाचे औषध प्राप्तं झालेले नाही. कोरोना काळात तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने औषध साठा करून ठेवण्यात आला होता.

शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये या अतिरिक्त औषध साठ्याचा वापर करण्यात आला होता. परंतु आता औषध तुटवडा भासण्याची शक्यता आहे करण, दीड महिना पुरेल एवढाच औषध साठा असल्याचे फुले यांनी सांगितले होते. नांदेड जिल्हा रुग्णालयात एका दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे औषध तुटवड्याचा हा मुद्दा अधिक उचलून धरण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी याची दखल घेऊन तातडीने बैठक घेतली. शासकीय रुग्णालयात औषध खरेदीसाठी ५ कोटी रुपये मंजूर केले.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांनी माहिती दिली की, सध्या आवश्यक औषधसाठा विशेषतः प्रतिजैविके आहेत. त्या व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधांसाठी स्थानिक खरेदीचा अधिकार वैद्यकीय अधिक्षकांना दिला आहे. जिल्हा नियोजनमधून औषधे खरेदीसाठी ५ कोटी अनुदान मिळाले असून, १५ दिवसांत औषध खरेदी प्रक्रिया पुर्ण केले जाईल, असे आश्वासन बैठकीत दिले होते.

RELATED ARTICLES

Most Popular