भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे टेम्पो चालवणाऱ्याने कोंडमळा बसस्टॉपवर उभ्या असणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक देत पळून गेला. यामध्ये वृद्धांचे उपचारादरम्यान निधन झाले तर पळून गेलेल्या चालकाला टेम्पोसह चिपळूण येथे पकडण्यात आले आहे. चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावर सावर्डेजवळ असणाऱ्या कोंडमळा निवाचीवाडी येथील बस स्टॉपवर यशवंत सखाराम मेस्त्री (वय ७५) आणि त्याचा मुलगा प्रमोद मेस्त्री हे सावर्डेला जाण्यासाठी उभे होते. बापलेक दोघेही सावर्डे येथे खरेदीसाठी दि २९ रोजी सायंकाळी निघाले होते.
म्हणूनच ते दोघे बसस्टॉपवर उभे होते. याच वेळी रज्जाक गकुर शिरगावकर हे आपल्या ताब्यातील टाटा आयशर टेम्पो (क्रमांक जी ए ० ४ टी ७०४२) हा घेऊन सावर्डे ते चिपळूण असा निघाला होता. भरधाव वेग आणि बेदरकारपणे टेम्पो चालवत होता. या टेम्पोची कोंडमळा निवाची वाडी बसस्टॉपवर उभ्या असलेल्या यशवंत मेस्त्री यांना जोरदार धडक बसली तर त्यांचा मुलगा प्रमोद बलाबल बचावले.
वृद्धाला धडक दिल्या नंतर टेम्पो सुसाट वेगाने चिपळूणच्या दिशेने पळून गेला. मात्र सावर्डे पोलिसांनी याची कल्पना चिपळूण पोलिसांना देताच पोलिसांनी चिपळूण येथे टेम्पो अडविला. वृद्धाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर चालक रज्जाक शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

