26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeDapoliतत्कालीन प्रांतधिकारी देशपांडे यांना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अटक

तत्कालीन प्रांतधिकारी देशपांडे यांना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अटक

दापोलीच्या मुरुड किनाऱ्यानजिक उभारण्यात आलेल्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी आता दापोलीचे तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांची रवानगी ३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली आहे. याआधी याप्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. नियम धाब्यावर बसून साई रिसॉर्टला बिनशर्त परवानगी देण्यात आल्याचा ठपका जयराम देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

देशपांडे यांना यापूर्वीच ईडीने ताब्यात घेतले होते, आता दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रायगड जिल्हा रोजगार हमीचे अधिकारी असलेले देशपांडे यांना साई रिसॉर्ट प्रकरणावरून सेवेतून निलंबित करण्यात आले होते. काही दिवसानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. त्यांची सुटका होण्याआधीच आता दापोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular