25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRajapurराजापुरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची केली सुखरुप सुटका

राजापुरात फासकीत अडकलेल्या बिबट्याची केली सुखरुप सुटका

उपळे-तळेखाजन प्रिंदावण रस्त्यालगत फासकीत मादी जातीचा बिबट्या अडकल्याचे दिसले.

तालुक्यातील उपळे-तळेखाजन-प्रिंदावण रस्त्यावर फासकीत अडकलेल्या बिबट्याला फासकीतून सुखरूप बाहेर काढण्यात. वनविभागाला यश आले. सुटकेनंतर या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही बिबट्याची मादी होती व तीचे वय एक ते दीड वर्षे असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राजापूर तालुक्यातील मौजे उपळे, उपळे-तळे खाजन-प्रिंदावण येथे रस्त्याच्या डाव्या बाजुला फासकीत एक बिबट्या अडकल्याची माहिती उपळेचे रहीवाशी व पंचायत समितीचे माजी सभापती कमलाकर कदम यांनी गुरुवारी सकाळी राजापूर वनविभागाला दिली.

यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता, उपळे-तळेखाजन प्रिंदावण रस्त्यालगत फासकीत मादी जातीचा बिबट्या अडकल्याचे दिसले. तात्काळ वनविभागाने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न हाती घेतले. सदर रेस्क्यू ऑपरेशन परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी प्रियंका लगड, राजापूर वनपाल सदानंद घाटगे, लांजा वनपाल दिलीप आरेकर, पाली वनपाल न्हान् गावडे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक लांजा सुरज तेली, वनरक्षक कोर्ले श्रीमती श्रावणी पवार, तसेच रेस्क्यू टिमचे दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये आदींनी स्थानिकांच्या सहकार्याने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular