27.1 C
Ratnagiri
Thursday, February 19, 2026

कशेळी पर्यटकांच्या पसंतीस; पण सुविधांची वानवा

समुद्राची गाज आणि वैशिष्ट्यपूर्ण सूर्यमंदिर यामुळे कशेळी...

बावनदी पूल वाहतुकीस खुला एका मार्गिकेवरून प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत...

राज ठाकरे ‘नंदनवनात’, एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
HomeRatnagiriतुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न उधळला, दोन भामटे गजाआड

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न उधळला, दोन भामटे गजाआड

चौकशीदरम्यान त्यांनी एका महिला प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली.

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या सर्तकतेमुळे असफल ठरला असून दोन भामट्यांना गजाआड करण्यात यश आले आहे. ड्युटीवर असलेले सचिन सावेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी चोरी उघडकीस आली. एस२, एस३ व एस४ या डब्यांमध्ये १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ट्रेन क्रमांक ११००४ ही ट्रेन रोहा स्थानक ओलांडल्यानंतर एस२ कोचमध्ये दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे सचिन सावेकर यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत सावेकर यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्या दोघांना एस८ कोचमधून पकडून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी एका महिला प्रवाशाची बॅग चोरल्याची कबुली दिली. झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून मंगळसूत्र, कानातले, बुगडी, ४,७५० रुपये रोख रक्कम तसेच मोबाईल असा मुद्देमाल सापडला.

ही घटना दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तात्काळ निर्णयक्षम ता दाखवत सचिन सावेकर यांनी दोन्ही संशयितांना रेल्वे. संरक्षण दल पनवेलकडे सुपूर्त केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सावेकर यांचे रेल्वे प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रशासनाचे सीएमडी (केआरसीएल) यांनी त्यांचे अभिनंदन करत १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच संचालक व विभागप्रमुखांनीही त्यांच्या धाडसपूर्ण आणि सतर्क कामगिरीचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular