27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

महिन्याला दहा टन प्लास्टिकचा होतो पुनर्वापर…

पर्यावरण रक्षणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत सह्याद्री...

इंजिनमध्ये बिघाड; तुतारी एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात थांबली

मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसचे इंजिन...

जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांची ८०० कोटी रूपयांची बिले थकली

राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता,...
HomeRatnagiriजिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त, निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख १५ हजार ६९ इतकी आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १६ लाख १५ हजार ६९ एवढी आहे. त्यामध्ये ८ लाख ५३ हजार ९४८ महिलांची, तर ७ लाख ६१ हजार १२१ पुरुषांची संख्या आहे. विशेष करून यामध्ये १८ ते १९ वयोगटातील १३ हजार ३८९, तर ८० वर्षापुढील ५९ हजार ३५३ मतदारांची संख्या आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील मतदारांचा आढावा दिला. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख १५ हजार ६९ इतकी आहे.

दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची ११२२ संख्या आहे. ग्रामीण लोकसंख्या १३ लाख ५१ हजार ३४६ आहे, तर शहरी लोकसंख्या २ लाख ६३ हजार ७२३ आहे. १३ लाख ३१ हजार १५० इतकी मतदार संख्या आहे. यामध्ये ६ लाख ८८ हजार ७४३ स्त्री मतदार, तर ६ लाख ४२ हजार २९६ पुरुष मतदार आहेत. तृतीयपंथी मतदार ११ असून, दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार ६९५ इतकी आहे. १८ ते १९ वयोगटातील १३ हजार ३८९ तर ८० वर्षापुढील ५९ हजार ३५३ मतदार संख्या आहे.

ग्रामीण भागात ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन करावे त्याचबरोबर शहरी भागात प्रभागनिहाय मतदार यादीचे वाचन करून त्याबाबत मतदारांची खात्री करावी. मतदारांची टक्केवारी जिथे कमी आहे त्याची कारणे शोधून त्याबाबत अभ्यास करा. त्याचबरोबर मतदान केंद्रावर सुविधा देण्याबाबत सर्वेक्षण करावे, असे आदेशही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले. मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत का, दिव्यांगांसाठी रॅम आहे का, विजेचा पुरवठा याबाबत सर्वेक्षण करून योग्य नियोजन करावे.

RELATED ARTICLES

Most Popular