28.1 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार...

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तो स्वप्नात येऊन सांगतोय की मदत करा !

रत्नागिरीतील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात एका पुरुषाचा...
HomeRatnagiriथिबा राजवाडा होणार अजून आकर्षक, नवीन ८ दालने

थिबा राजवाडा होणार अजून आकर्षक, नवीन ८ दालने

रत्नागिरीमधील प्रसिध्द आणि प्रेक्षणीय स्थळ असलेला ब्रिटीशकालीन थिबा राजवाडा आता अधिकच खुलून दिसणार आहे.

रत्नागिरीमधील प्रसिध्द आणि प्रेक्षणीय स्थळ असलेला ब्रिटीशकालीन थिबा राजवाडा आता अधिकच खुलून दिसणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना याठिकाणी विविध कला-वस्तूंच्या दालनांची माहिती मिळणार आहे. त्यासाठी शासनाकडे येथील पुरातत्व विभागाकडून ३  कोटी २२ लाखांचा प्रस्ताव सादर केला गेला आहे. हा निधी मंजूर होताच नवीन ८ कला दालनांच्या कार्याला सुरुवात करण्यात येणार आहे.

थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीवर सध्या कोट्यावधीचा निधी खर्च केला जात असून, या स्थळाचा विकास करण्यासाठी पर्यटन निधीतूनही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत आहे. थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात आल्यावर पुरातत्व विभागाने राजवाड्याचे अंतर्गत विभाग पर्यटकांसाठी खुले केले. परंतू, अजून अंतर्गत काही कामांची दुरूस्तीची कामे व परिसराचा विकास अजूनही अपूर्ण राहिलेला आहे.

गतवर्षी राजवाडा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. राजवाड्यात एकूण १४  खोल्या आणि दोन मोठी दालनं आहेत. मात्र येथील दालनांचा विकास करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जेणेकरून राजवाड्याची माहिती घेण्याबरोबरच येथे भेट देणारे पर्यटक इथेच आणि परिसरामध्ये गुंग होतील.

राजवाड्यात ८ विविध संग्रहीत कला व वस्तूंची दालने उभारण्यात येणार असून, त्यामध्ये ऐतिहासिक वस्तू, पुरातन वस्तू दालन, चित्र दालन, शस्त्र दालन,  मूर्ती दालन, नौका दालन  अशा विविध दालनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्व साहित्यामध्ये कोल्हापुरमधून २१  जहाज व होड्या, मचवा, पगार, होडी, पडाव, पोर्तुगिज बोट, बग्गाला, पोर्तुगिज, बाँब केज, गुराबा, ब्रिटीश गॅली, बतला, कोथया, अरब डो, अरब बार्ज, गलबत, डांगी,इंग्लिश स्मॉल गॅलन, ब्रिटीश गली, पाल, पोर्तुगिज गॅलॅलो अशा विविध प्रकारांच्या जहाजांचा समावेश आहे.

या दालनांच्या निर्मितीचा ३  कोटी २२ लाखांचा प्रस्ताव येथील पुरातत्व विभागाद्वारे शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच त्वरितच दालन निर्मिती कार्याला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular