भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला तर श्रीलंकेच्या संघाने दुसरा सामना 32 धावांनी जिंकला.
या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी, भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत ज्यामध्ये ऋषभ पंत दीर्घ कालावधीनंतर परतला आहे आणि रायन परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे. अर्शदीप सिंग आणि केएल राहुलच्या जागी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.