22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraमहाराष्ट्र राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल!

महाराष्ट्र राज्याला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल!

खा. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरदेखील निशाणा साधला.

महाराष्ट्रात सध्या राजकारण जोरात सुरू असून राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळेल असे सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. तिसरा उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. खा. संजय राऊत यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्यावर असावा अशी चर्चा त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. खा. संजय राऊत यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे विधान करताना विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षावर निशाणा साधला आहे. सध्या राज्यामध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य करताना संजय राऊतांनी हे विधान केलं आहे.

अमित शाहांवरदेखील निशाणा – प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खा. राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरदेखील निशाणा साधला. बाळासाहेबांची शिवसेना फोडून अमित शाहांनी समांतर शिवसेना तयार केली आहे. एकनाथ शिंदेंचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. त्यांनी स्वतःच्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा. काल ते मुख्यमंत्री होते. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. उद्या ते ही राहणार नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो, असं खा. संजय राऊत म्हणाले.

तिसरा उपमुख्यमंत्री – मंत्रा शिंदे उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतोय आणि तो त्यांच्याच पक्षातला आहे, अस देखील खा. संजय राऊत म्हणाले. खा. संजय राऊत यांच्या विधानाचा रोख शिंदेंच्या पक्षातील आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आरोप-प्रत्यारोप – काही दिवसांपासून खा. राऊत आणि ना. उदय सामंतांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील २० आमदार हे उदय सामंत यांच्यासोबत आहेत, असं खा. संजय राऊत यांनी म्हटलं होतं. एकनाथ शिंदे पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणार असल्याचं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं होतं. येत्या ३ महिन्यांत शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे १० माजी आमदार, काही जिल्हाप्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार-खासदार आणि पदाधिकारी शिवसेनेत सामील ‘ होतील असा दावा उदय सामंतांनी परदेश दौऱ्यावर असताना केला. यावरुन संजय राऊत चांगलेच संतापले.

दौऱ्याचा खर्च वसूल करा ! – उद्योगमंत्री उदय सामंतांवर निशाणा साधताना खा. संजय राऊत यांनी परदेशात बसून शिवसेनेत फूट पडणार असल्याचं विधान केल्यावर आक्षेप नोंदवला होता. उद्योगमंत्री तिथे शिवसेनेचे किती लोक फुटणार यावर बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सामंत यांना ताबडतोब मुंबईला पाठवलं पाहिजे. सरकारी ‘खर्चाने तिथे गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे अशी मागणी करत परदेशातील परिषद ही राजकारण करण्याची जागा आहे का? असा सवाल खा. राऊतांनी विचारला होता.

मरण पत्करू पण….. – ना. उदय सामंतांवर आणि उपमुख्यमत्री ना. एकनाथ शिंदेंच्या पक्षावर निशाणा साधताना खा. संजय राऊतांनी, त्यांच्यावर ‘मेरा बाप चोर हैं’ चा शिक्का आहे. आता खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना भेटले एवढंच सांगायचं बाकी आहे. यांनी आयुष्यभर फोडाफोडी केली. हे भटकते आणि लटकते आत्मा आहेत. तुम्ही या राज्याची प्रतिमा सांभाळा. तुम्ही परदेशात बसून शिवसेना फुटणार हे सांगता, तुम्हाला लाज वाटतं नाही? आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही. उदय सामंत हे शिंदे यांचे आमदार फोडायला परदेशात गेले आहेत, हे मी पुन्हा सांगतो. एकनाथ शिंदे यांना कोणाचे आशीर्वाद आहेत? शिंदे हे फडणवीस यांना नकोसे झाले आहेत उद्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नकोसे होतील, अशा आक्रमक शब्दांत खा. संजय राऊत यांनी हल्लाबोल चढविला होता.

RELATED ARTICLES

Most Popular