23.1 C
Ratnagiri
Thursday, February 12, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeRatnagiriशहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला पसंती

शहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला पसंती

सणासाठी व्यापाऱ्यांसह ऑनलाइन कंपन्यांनी चांगलीच सूट सवलत दिल्याने खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

दिवाळीच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठा गजबजल्या असल्या तरी देखील, अनेकांनी मात्र ऑनलाईन खरेदीच करण्याकडे भर दिला आहे. तर काही जणांनी मात्र कोविडचे कोणतेही निर्बंध नसल्याने बाजारात जाऊन मनसोक्त खरेदी केली. या सणासाठी व्यापाऱ्यांसह ऑनलाइन कंपन्यांनी चांगलीच सूट सवलत दिल्याने खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. शहर आणि ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला अधिक पसंती मिळाल्याने त्याचा फटका मात्र लहान व मध्यम स्थानिक विक्रेत्यांना बसला आहे. कोट्यवधींच्या उलाढालीत स्थानिक विक्रेत्यांना नुकसानीचा सामना करावा लागला.

कोरोना, अतिवृष्टी, वादळ आणि महापुरातून स्थानिक व्यापारी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी ऑनलाइन खरेदी न करता स्थानिक दुकानातून खरेदी करावी अशी हाक व्यापाऱ्यांनी दिली होती; मात्र ऑनलाइन कंपन्यांनी ३० ते ४० टक्क्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर विशेष सूट देण्यात आली. अवघ्या तीन ते चार दिवसात वस्तू घरपोच मिळत असल्याने यावर्षी दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ झाली. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिक अडचणीत सापडले. अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणांसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध होत आहेत.

ग्राहकांचा कल ऑनलाइनकडे वाढला आहे. ऑफर्स आणि सूटच्या जाळ्यात ग्राहक ऑनलाइन खरेदीत अडकत चालले आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसात घरपोच मिळतात. या वस्तूंत तांत्रिक अडचण असेल तर परत करण्याची सुविधा आहे. त्यामुळे दिवाळीत शहरातील दुकानांमध्ये तुरळक गर्दी बघायला मिळाली. तरुणाई इंटरनेटवर जास्त वेळ व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीत तरुणांची संख्या जास्त आहे. आणि स्थानिक बाजारपेठेपेक्षा ऑनलाइन खरेदीत ग्राहकांना असंख्य पर्याय उपलब्ध असतात. त्या तुलनेत दुकानात मात्र तेवढे पर्याय उपलब्ध होत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular