27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraयंदाही नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट, गरबा-दांडियावर बंदी

यंदाही नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट, गरबा-दांडियावर बंदी

सध्या आटोक्यात आलेला कोरोना अजून हातपाय पसरू नये यासाठी, राज्य प्रशासन खूपच काळजी घेत असल्याने यंदाच्या नवरात्रीसाठी सुद्धा नियमावली आखून देण्यात आली आहे.   

गणपतीनंतर सर्वाना वेध लागतात ते नवरात्रीचे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे तरुणाई साठी पूर्ण धम्माल करण्याचे क्षण. पण मागील दीड वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सणांवर बंधने आली आहेत. सध्या आटोक्यात आलेला कोरोना अजून हातपाय पसरू नये यासाठी, राज्य प्रशासन खूपच काळजी घेत असल्याने यंदाच्या नवरात्रीसाठी सुद्धा नियमावली आखून देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये कोरोना सध्या नियंत्रणामध्ये आला असला तरी अजूनही काही प्रमाणात दररोज रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी पालिकेने कोरोना खबरदारीची नियमावली जाहीर केली आहे.

उपायुक्त हर्षद काळे यांनी जारी केलेल्या परिपत्रक नियमावलीमध्ये म्हटल्याप्रमाणे, सार्वजनिक मंडळांच्या उत्सवासाठी ४ फुटी तर घरगुती उत्सवासाठी २ फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती असता कामा नये. कोरोना निर्बंधासाठी गरजेचे असणारे नियम जसे कि, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझेशनसह सर्व प्रकारची कोरोना खबरदारी घेणे अनिर्वाय आहे. मुख्य म्हणजे गरबा-दांडियाचे आयोजन न करता आरोग्य व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे निर्देश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

देशभरात पुढील आठवडय़ात ७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होणार असून नवरात्री उत्सवाला तेंव्हापासून प्रारंभ होत आहे. मात्र यावर्षीच्या उत्सवावर देखील कोरोनाचे सावट आहेच. सार्वजनिक उत्सवासाठी पालिकेची परवानगी घेणे अनिर्वाय आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट अजून समूळ नष्ट न झाल्याने, मुंबईकरांनी कोरोना खबरदारी घेऊनच उत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोना संसर्ग सध्या आटोक्यात आला असून, कोणीही कोरोना स्प्रेडर ठरू नये याची विशेष काळजी घेण्याचे पालिकेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular