भारतातील अग्रगण्य वेदर फॉरकास्टिंग कंपनी असलेल्या स्कायमेटनं २०२२ या वर्षातील पावसाबद्दल अंदाज वर्तवला आहे. साधारण जून महिन्यात भारतामध्ये मान्सूनचं आगमन होतं. भारतातील मान्सून पूर्णपणे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून हिमालयाकडे येणाऱ्या मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असतो.
हे वारे भारताच्या नैऋत्य किनारपट्टीवरील पश्चिम घाटावर आदळतात, तेव्हा भारत आणि त्याच्या बाजूच्या देशांमध्ये मुसळधार पाऊस पडतो. या वाऱ्यांचा अभ्यास करून सरकारी आणि विविध खासगी कंपन्या मान्सूनचा अंदाज लावला जातो. भारतातील सर्व शेतकरी मान्सूनच्या या अंदाजावरच अवलंबून राहून शेतीचे नियाजन करत असतात. शेतीची पूर्व तयारी हि दिलेल्या पावसाच्या अंदाजावरून ठरते आणि त्यामध्ये कोणते पिक घ्यावे आणि घेऊ नये याचा संपूर्ण विचार या कालावधीत शेतकरी करून ठेवतो.
स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतामध्ये या वर्षी सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी आपल्याकडे मान्सून समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी सरासरी ८८०.६ मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
स्कायमेटने आपल्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या माहितीप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये केरळ आणि कर्नाटक मध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल. तर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, युपी, या भागातील कृषी क्षेत्रांत काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाउस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जूनच्या सुरुवातीच्या काळामध्येच पावसाचा आरंभ दमदार होणार असल्याची अपेक्षा आहे. मान्सूनच्या बहुगोलिक वितरणाचा विचार केल्यास, गुजरात, राजस्थान, मणिपूर, मिझोरम, नागालंड, विपुरा या ईशान्य दिशेकडील राज्यांमध्ये पावसाचे ४ महिने कमीच प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.