मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या जेसीबीमधील डिझेल चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना संगमेश्वर पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडील डिझेलसह ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने ही चोरी उघडकीस आणली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांच्यामार्गदर्शनाखाली पोलीस कांबळे, खोंदल व चालक जाधव यांनी ही कामगिरी केली. याबाबत संगमेश्वर पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी रात्री हा नेहमीप्रमाणे कळंबस्ते मोहल्ल्याजवळ हायवे रोडच्या कडेला एसीई कंपनीच्या जेसीबीचे (नंबर एम. एच. ०८ ए.एन. २४१८) काम चालू होते. रात्री जेसीबीला लागणारे डिझेल हे प्रत्येकी ६० लिटर मापाच्या. तीन कॅनमध्ये भरून ठेवले होते, परंतु रात्री जेसीबीने काम केले नसल्याने शिल्लक डिझेल पुढील कामासाठी ठेवले होते.
बुधवारी त्याठिकाणी तीन कॅमधील अंदाजे १५० लिटर डिझेल अज्ञात व्यक्तीने काढून घेतले. याबाबत जयंतीलाल घेवर चंदनानेचा याने अज्ञात इसमाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. संगमेश्वरचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे, पोलीस खोदल व चालक जाधव १९ जुलै रोजी रात्री गस्त घालत डिझेलसह ६३ हजार ८३५ असताना १.१५ वाजता कोंडिवरे केंबलेवाडी रोडलगत एका लाल रंगाच्या मॅक्सिमो रुपयांचा मुद्देमाल गाडीत दोन व्यक्तींच्या जप्त. हातात दोन प्लास्टीकचे कॅन आढळले. त्यांच्याकडे १०,१७६ रुपये, ६६४ रूपये, १९३० रुपये व ६५ रुपये किंमतीचे डिझेल १० लिटरच्या कॅनमध्ये’ व मॅक्झिमो गांडी असा एकूण ६३ हजार ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.