25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriजिल्ह्यात आज फुटणार हजारो हड्या राजकीय पक्षांच्या हंड्या कोण फोडणार?

जिल्ह्यात आज फुटणार हजारो हड्या राजकीय पक्षांच्या हंड्या कोण फोडणार?

रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी होणाऱ्या दहिहंडीचा उत्सव संरक्षक बंधाऱ्यामुळे या वर्षी तो भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे.

गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यावर थिरकत मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. गोपाळकाल्याच्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यात ३०९ सार्वजनिक तर ३ हजार ४३ खासगी दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. त्या फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षिसांची लयलूट करायला मिळणार आहे. प्रतिष्ठेसाठी राजकीय पक्षांच्या लाखो रुपयांच्या हंड्या ठिकठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. रत्नागिरीम ध्ये राजकीय हंड्या उभारण्याची जागा यंदा बदलली असून मांडवीऐवजी भाट्ये किनारी त्या बांधल्या जाणार आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

थरांवर थर लावण्याचा सराव गेले काही दिवस ग्रामीण भागात सुरू आहे. जिल्ह्यात शहर परिसरात ७ ते ८ थर असणाऱ्या हंड्या बांधल्या जातात. शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी होणाऱ्या दहिहंडीचा उत्सव संरक्षक बंधाऱ्यामुळे या वर्षी तो भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तसे जाहीर करण्यात आले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दापोली तालुक्यात ३८ सार्वजनिक तर ३२७ खासगी दहीहंड्या फुटणार आहेत.

घराघरात दहीहंडी सण साजरा केला जातो. तालुक्यात गोपाळकालाच्या दिवशी गावात घरोघरी जाऊन गोविंदा हंड्या फोडल्या जाणार आहेत. पूर्वी मोजक्याच घरात हंडी फोडली जात होती. आता प्रत्येक घरात हौस म्हणून छोटीशी हंडी बांधून ती फोडली जाते. राजकीय दहीहंड्याकडे लक्ष यंदाचा गोविंदा राजकीय रंगातदेखील भिजला असून रत्नागिरीत विविध राजकीय पक्षांनी हंड्या उभारल्या आहेत. मोठ्या बक्षिसांच्या राजकारणांच्या या दहीहंड्या कोण फोडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदय सामंतांची हंडी प्रतिवर्षी मांडवी किनारपट्टीवर पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावतीने दहीहंडी उभारण्यात येत असते.

यावर्षी ही हंडी मांडवी ऐवजी भाट्ये समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात येणार आहे. लाखोंची बक्षिसे या हंडीसाठी लागली आहेत. या हंडीसोबतच येथून जवळच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून दहीहंडी उभारण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनू गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हंडी उभारली आहे. येथेही गोविंदांना मोठी बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. शहरातील स्वातंत्र्यवीर चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने व तेलीआळी नाक्यावर स्व. उमेश शेट्ये मित्रमंडळाच्यावतीने युवा सेनेचे केतन शेट्ये यांच्या पुढाकारातून हंडी उभारण्यात आली आहे. मानाची हंडी फोडणाऱ्या ११ हजार १११ रुपयांची चांदीची गदा बक्षिस मिळणार आहे.

पाचव्या थरापासून प्रत्येक थराला बक्षिस देण्यात येणार आहे. रत्नागिरीतील साळवीस्टॉप परिसरात ट्रक चालक मालक मोटार असोसिएशनच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने अनेक कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular