27.1 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriरत्नागिरीला बांगलादेशी, रोहिंगे, नेपाळ्यांपासून धोका - मनसेचा आरोप

रत्नागिरीला बांगलादेशी, रोहिंगे, नेपाळ्यांपासून धोका – मनसेचा आरोप

आठ एजंटांद्वारे त्यांना कमी रोजंदारीवर आणले जात असल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशीय, रोहिंगे आणि नेपाळी नागरिक आहेत. भारताचे नागरिक नसतानाही ते बेकायदेशीरपणे जिल्ह्यात वास्तव्य करून आहेत. त्यांच्यामुळे रत्नागिरीला धोका निर्माण झाला आहे. या नागरिकांची कोणतीही माहिती किंवा नोंद पोलिस दलाकडे नाही. त्याबाबत ठोस कारवाई पोलिसांनी करावी तसेच रत्नागिरीत अनधिकृत प्रार्थनास्थळे असून, तेथे परराज्यातील अनोळखी मुलं असल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. त्याची पोलिसांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी केली आहे. जिल्हा शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सौंदळकर म्हणाले की, ज्या पद्धतीने बांगलादेशी, रोहिंगे आणि नेपाळी नागरिकांचा लोंढा जिल्ह्यात आला आहे तो जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. नागरिकत्व नसताना बेकायदेशीरपणे हे लोक जिल्ह्यात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यात सुमारे आठ एजंटांद्वारे त्यांना कमी रोजंदारीवर आणले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नेपाळी तर रखवालदार, खलाशी, गुरखे म्हणून काम करत आहेत. ते मुलींची छेड काढून आणि गंभीर गुन्हा करून येथून पलायन करतात. रत्नागिरीच्या सुरक्षेसाठी हे घातक आहेत. स्थानिक गरिबांना रेशन कार्ड, आधार कार्ड मिळताना नाकीनऊ येतात; परंतु नेपाळ्यांसह काहींकडे आधारकार्ड असल्याचा आमच्याकडे पुरावा आहे. मग त्यांना यंत्रणा कोणत्या पुराव्यावर ही ओळख देतात, ते कळत नाही. त्या देशाचे नागरिकत्व सोडल्या शिवाय या देशाचे नागरिकत्व घेता येत नाही; परंतु बांगलादेशीय, रोहिंगे, नेपाळ्यांकडे दोन्ही देशांचे नागरिकत्व कसे असते? हे सर्व गंभीर आणि धोकादायक आहे. पोलिसांनी त्याचा गांभीर्याने विचार करून अशांच्या इत्थंभूत नोंदी ठेवाव्यात.

आमच्याकडे नुकतीच एक तक्रार आली आहे. काही निवासी सदनिकांमध्ये बेकायदेशीरपणे प्रार्थनास्थळे उभारली जात आहेत. काही बिल्डरांना हाताशी धरून खुले पार्किंग बंदिस्त करून तेथे ही प्रार्थनास्थळे सुरू आहेत. एसटी कॉलनी येथून आमच्याकडे तक्रार आली आहे. तेथे काही परदेशातील मुलांना आणून ही प्रार्थनास्थळे सुरू ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी, असे सौंदळकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular