27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriहातखंबा ते निवळी दरम्यान तासाभरात तीन अपघात

हातखंबा ते निवळी दरम्यान तासाभरात तीन अपघात

अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले.

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूल समोरील वळण, निवळी आणि हातखंबा-झरेवाडी येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जण जखमी झाले. अपघाताची ही घटना शनिवार २८ जून रोजी सकाळी ९.३० ते १०.१५ वा. कालावधीत घडली आहे. त्यामुळे शनिवार हा घातवार ठरला आहे. हातखंबा हायस्कुलसमोरील वळणात डंपरच्या धडकेत मंगेश मधूकर भस्मे (४२, रा.पाली गराटेवाडी, रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील अॅक्सेस दुचाकी (एमएच-०८-एएल-०६७०) वरुन पाली ते रत्नागिरी असे येत होते. ते हातखंबा हायस्कुलसमोरल वळणात आले असता समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिल्यामुळे गंभिर जखमी झालेल्या मंगेश भस्मे यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिंटर सर्व्हिस स्टेशन व नवीन प्रिंटर्स विक्रेते मंगेश भस्मे हे पाली येथून आपल्या दुकानात येण्यासाठी रत्नागिरीकडे येत होते हातखंबा शाळेजवळ त्यांच्या दुचाकीला एका डंपरने जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की त्यात मंगेश भस्मे गंभीर जखमी झाले त्यांच्या दुचाकीचा ही चक्काचूर झाला. अपघाताची दुसरी घटना ही शनिवारी सकाळी ९.३० वा. सुम ारास निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात घडली. यातील फिर्यादी व जखमी रविंद्र गोविंद पाचकुडे (४३, रा. करबुडे-पाचकुडेवाडी, रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-पी-४४१२) वर पाठीमागे पत्नी अस्मिता पाचकुडे हिला बसवून करबुडे ते रत्नागिरी असे येत होते. ते निवळी येथील वॉटर स्पोर्टच्या अलीकडील वळणात आले असता समोरुन येणारा ट्रेलर (केए-२२-डी-५३०३) वरील चालकाने रस्त्याच्या उजव्या बाजुला येत त्यांच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात पाचकुडे दांपत्य दुचाकीवरुन रस्त्यावर पडल्याने रविंद्र पाचकुडे यांच्या डोक्याला, हातांना गंभीर दुखापत झाली तर त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली.

अपघातांची तिसरी घटना शनिवारी सकाळी १०.५० वा. सुमारास हातखंबा-झरेवाडी येथे घडली. या अपघातातील दुचाकी चालक पियूष प्रेमकुमार भारती (१९, रा. खेडशी गयाळवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील युनिकॉर्न दुचाकी (एमएच ०८-एवाय-०२८६) वर पाठीमागे त्याचा मित्र ऋषीकेश शिवराम बावधने (२४, रा. पांगरी, रत्नागिरी) याला सोबत घेउन माचाळला फिरण्यासाठी जात होते. ते झरेवाडी स्टॉपजवळील वळणात आले असता पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणारा ट्रक (जीजे-०३-बीव्ही-०१०८) ला त्याने धडक देत अपघात केला. या अपघातात दोघेही गंभिर जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular