23.4 C
Ratnagiri
Saturday, February 7, 2026

रत्नागिरीत पार्किंगच्या जागेत बाग – स्मार्ट सिटी योजना

शहरातील मारुती मंदिर स्टेडियमच्या बाजूला असणाऱ्या पार्किंगच्या...

विमान अपघाताच्या चौकशीत धक्कादायक बाब आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीला...

शनिवारच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज, पोलिसांचांही तगडा बंदोबस्त

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक...
HomeRatnagiriएकाचवेळी हजारोंची लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले, जिल्हा प्रशासनात खळबळ

एकाचवेळी हजारोंची लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले, जिल्हा प्रशासनात खळबळ

१६,५०० रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

स्थानिक निधी लेखापरीक्षण वर्ग -१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला लाच घेताना गुरूवारी सायंकाळी सापळा रचून पकडण्यात आले. लेखापरीक्षण-अहवालातील काही मुद्दे वगळण्यासाठी तब्बल २४,००० रूपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ही रक्कम १६,५०० रूपये इतकी ठरली आणि १६,५०० रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एकाचवेळी तिघांना पकडलं अधिक वृत्त असे की, दापोली पंचायत समितीतील लेखापरीक्षणातील प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी एका सहाय्यक लेखाधिकाऱ्याकडून १६५०० रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सायंकाळी उशीरा एकाचवेळी ३ लोकसेवकांना रंगेहाथ पकडले. यामध्ये स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी सिध्दार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांचा यामध्ये समावेश असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

दापोली पंचायत समितीतील कर्मचारी – या प्रकरणातील तक्रारदार हे दापोली पंचायत समितीमध्ये सहाय्यक लेखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२०२१ आणि सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला होता.

२१ मुद्दे वगळण्यासाठी…. – हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी, तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांनी भेट घेतली. त्यावेळी २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्यावतीने घवाळी याने तक्रारदाराकडून २४,००० रूपयांची लाच मागितली. संबंधितांनी तक्रार नोंदविताच रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी सापळा रचला.

रंगेहाथ पकडले – एसीबी पथकाने ११ सप्टेंबरलाच पडताळणी केली. तडजोडीअंती १६,५०० रूपये देण्याचे ठरले. स्थानिक निधी लेखापरीक्षण एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात सायंकाळी ७वा. ४५ मि. सहाय्यक संचालक शरद कार्यालयात जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळी याने तक्रारदाराकडून १६,५०० रूपयांची लाच स्विकारली आणि ती रक्कम तत्काळ जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखाधिकारी सिध्दार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केली. तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही बातमी शुक्रवारी कळताच अवघ्या जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या मोठ्या कारवाईची जोरदार चर्चा प्रशासनात सुरू होती.

RELATED ARTICLES

Most Popular