27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...
HomeRatnagiriदाभोळे ते हातखंबा पोलीसांचा थरारक पाठलाग ! चौघेजण ताब्यात

दाभोळे ते हातखंबा पोलीसांचा थरारक पाठलाग ! चौघेजण ताब्यात

३ लाखांचा गुटखा आणि ५ लाखांची गाडी असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रात्रीच्या काळोखाचा गैरफायदा घेऊन गुटखा विक्रीसाठी देणाऱ्या गुटखा माफियांना पोलीसांनी थरारक पाठलाग करून दणका दिला. देवरूख पोलीसांनी हातखंबा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने, ३ लाखांचा गुटखा आणि ५ लाखांची गाडी असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देवरूख पोलिसानी चौघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. सोमवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे देवरुख पोलीसांच्या निदर्शनास आले. चौकशीसाठी पोलीस जवळ जाताच चालकाने गाडी वेगात पळवली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग सुरू केला आणि हातखंबा ग्रामीण पोलीसांना याची माहिती दिली.

संयुक्त कारवाईत हातखंबा येथे गाडी अडवण्यात आली. झडती दरम्यान विक्रीसाठी बेकायदेशीर गुटखा आढळून आला. गाडीतील चौघांना ताब्यात घेत गाडी व गुटखा असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तू विरोधी मोहिमेला गती दिली आहे. या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या यशस्वी धाडसी कारवाईबद्दल देवरूख पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular