27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunतिवरे-धनगरवाडीतील पाणीप्रश्न निकाली विहिरीचे काम पूर्ण - योजनेचे उद्घाटन

तिवरे-धनगरवाडीतील पाणीप्रश्न निकाली विहिरीचे काम पूर्ण – योजनेचे उद्घाटन

तालुक्यातील तिवरे धनगरवाडी पाण्यापासून वंचित होती. उन्हाळ्यात त्यांना दरवर्षी वणवण भटकावे लागायचे. धनगर समाजातील आठ कुटुंबे अनेक वर्षे पाण्यासाठी धडपडत होते. आमदार शेखर निकम यांनी या कामी पाठपुरावा करून विहीर मंजूर केली. टंचाई आराखड्याअंतर्गत निधीची तरतूद केली. या विहिरीचे काम मार्गी लागले असून धनगरवाडीचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. तिवरे भेंडवाडी शिंगाडे कुटुंबाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी चिपळुण तालुका धनगर समाज संघटनेच्या पदाधिकारी यांचे विशेष प्रयत्न सुरू होते. भेंदवाडी येथील धनगर समाजातील शिंगाडे कुंटुबीय १९३५ पासून योजनेचे उद्घाटन करून त्यांना पाणी उपलब्ध करून दिले.

या वेळी मनोगत व्यक्त करताना आमदार निकम म्हणाले, आता धनगरवाडीतील पाण्याची समस्या मार्गी लागली आहे. तिवरे धनगरवाडीत पाणीयोजना झाल्याने तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने आमदार निकम, पाणीपुरवठा विभाग तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे धनगर समाज संघटनेने या सर्वांचे आभार मानले. १९३५ पासून शिंगाडे कुटुंबांचे या ठिकाणी वास्तव्य आहे; परंतु लोकप्रतिनिधी म्हणून पहिलेच आमदार आमच्या दारी आल्याचे मत काशिराम शिंगाडे यांनी व्यक्त केले. या वेळी तिवरे सरपंच गजानन साळवी, ओवळी सरपंच दिनेश शिंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular