बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण प्रभावी साधन आहे. हे लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ पासून तीन फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष ५.० लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही बालक या लसीकरण मोहिमेपासून वंचित राहू नये यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन सव्र्व्हे करणार आहेत, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण यांनी सांगितले. पुजार ‘मिशन इंद्रधनुष्य’ या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची सभा झाली. यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले-गावडे, जिल्हा आता बाल संगोपन अधिकारी डॉ.पल्लवी पगडाल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे, तसेच इतर विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेत गरोदर माता व शून्य ते ५ वर्षे वय असलेली बालके, लसीकरणापासून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी आहेत. यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करावयाचे आहे. याबाबत सर्व आरोग्य संस्थांना यासंबंधित माहिती देण्यात आली आहे आणि आरोग्य संस्थाकडून माहिती घेण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ही मोहीम तीन टप्प्यांमध्ये दि. ७ ते १२ ऑगस्ट २०२३, ११ ते १६ सप्टेंबर २०२३, ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान राबवली जाणार आहे. लसीकरण सत्राचे नियोजन शहरी, ग्रामीण अशा दोन्ही भागात केले जाईल. सर्व सत्रे यु-विन अॅपवर तयार करण्यात येणार आहेत. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी या मोहीम कालावधीमध्ये आपले अर्धवट राहिलेले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांनी केले आहे.