25.3 C
Ratnagiri
Sunday, September 7, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeMaharashtraटोमॅटोचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता, आत्ताच शतक

टोमॅटोचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता, आत्ताच शतक

गेल्या काही दिवसांपासून भाज्या विशेषतः टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडू शकतात.

महागाईच्या भडक्यामध्ये लिंबाच्या दरानंतर नंतर सध्या भाजी मंडईत टोमॅटोचे दर चढ झाले असून, सध्या टोमॅटोच्या दराची स्पर्धा थेट पेट्रोल-डिझेलच्या किमतींशी सुरू असल्याचे दिसत आहे. भाजी मंडईत टोमॅटोचे भाव पुन्हा वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यामध्ये टोमॅटोच्या दरांनी शंभरी पार केली होती. कोकणात दर ८० रुपयापासून वाढत जाऊन १२० रुपये किलो एवढा झालेला दिसून येत होता.

मान्सूनपूर्व पावसामुळे महाराष्ट्रातील पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कारणास्तव काढणीही पुढे ढकलण्यात आली. त्याचा परिणाम टोमॅटो पिकावर स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजी मंडईत सध्या इतर भाज्यांच्या तुलनेत टोमॅटोची आवक नगण्य आहे. त्याचप्रमाणे बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या टोमॅटोचा दर्जा उत्तम नाही. खराब झालेला किंवा कच्चा टोमॅटो बाजारात विक्री साठी मोठ्या प्रमाणात येत आहे.

उत्तम प्रतीच्या टॉमेटोला मागणी चांगली आहे.  परंतु सध्या टोमॅटो १०० रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाज्या विशेषतः टोमॅटोच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडू शकतात. मागील वर्षी याच काळात टोमॅटो ६० रुपये किलोने विकला जात होता आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भावात १०० रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर भाव १० रुपये किलोपर्यंत खाली आले. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हंगाम बंद असल्याने टोमॅटो लागवडीखालील जमीन कमी आहे. टोमॅटो काढणीचा हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस आणि कमी लागवडीचा परिणाम भाव वाढण्यावर झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular