27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeLifestyleभविष्यातील टॉप १० करियर क्षेत्र

भविष्यातील टॉप १० करियर क्षेत्र

आतापर्यंत आपले हे जग दुकानदाराच्या मानसिकतेनुसार चालत आले की, ग्राहक चालत दुकानापर्यंत आला पाहिजे. पण या एकविसाव्या शतकामध्ये दुकानाला ग्राहकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. आपण जर तरुण आहात किंवा आत्ताच आपल्या हातात डिग्री आली आहे तर असे करिअर ऑप्शन्स जे तुम्हाला पुढची पन्नास वर्ष अवैध नाही झाले पाहिजे असे पर्याय निवडणं गरजेचं आहे. आज आपण असेच टॉप १० पर्याय पाहणार आहोत जे करिअरच्या दृष्टिकोनातून पुढची जवळपास पन्नास वर्षे तरी टिकून राहतील.

१. व्यावसायिक कलाकार (कमर्शियल आर्टिस्ट)

आर्टिस्ट हे शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक छबी उभी राहते, कुर्ता पायजमा घातल्या माणूस आणि त्याच्या हातामध्ये त्याची कापडी बॅग ! पण एकविसाव्या शतकातला कमर्शियल आर्टिस्ट हा पूर्णपणे वेगळा आहे कारण या डिजिटल युगामध्ये त्याला आपले चित्र अथवा आपली कला लोकांपर्यंत कशी पोहोचवणार याची त्याला पूर्ण माहिती आहे.

commercial artist

जगामध्ये ऑनलाईन ऑक्शन होत आहेत आणि त्या ऑनलाइन ऑक्शन मध्ये जगभरातल्या कोणत्याही कोपऱ्या मधून आपले आर्ट लाखोंनी किमतीला लोकांना देत आहेत. एकविसाव्या शतकामध्ये सर्व व्यवसायिक आपला व्यवसाय डिजिटल माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या लोगोज, डिजिटल आर्ट, मेनू कार्ड किंवा इतर काही आर्टिस्टिक इमेज बनवण्यासाठी त्यांना कमर्शिअल आर्टिस्ट गरज आहे. अगदी घरी बसून देखील एखाद्या कमर्शिअल आर्टिस्ट त्याच्या अनुभवावरुन लाखोंनी पैसे कमवू शकतो त्यासाठी त्याला कोणत्याही कंपनीत जायची देखील गरज नाही त्यामुळे आत्ताच्या एकविसाव्या शतकात कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून आपण आपली कला देखील जोपासू शकता आणि त्याच बरोबर चांगल्या प्रकारचे पैसे देखील कमवू शकता. 

२. आरोग्य सेवा (हेल्थ केअर)

डॉक्टर्स, नर्सेस, हेल्थकेअर एक्सपर्ट हे पारंपारिक करिअर मधले ऑप्शन्स आहेच. पण आपण जर टेक्नॉलॉजीचा विचार केला तर हेल्थकेअर मधले नवीन ऑप्शन्स आता आपल्यासमोर नक्कीच येणार आहेत.

heathcare workers

भारतासारख्या विकसनशील देशामध्ये टेलिमेडिसीन च्या माध्यमाद्वारे हेल्थ केअर सारखा नवीन पर्याय विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. भारतात ज्या ठिकाणी हेवी मेडिकल साहित्य आणि एक्सपर्ट डॉक्टर पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी येणाऱ्या काही काळामध्ये ५ जी माध्यमाद्वारे डॉक्टर रिमोट सर्जरी किंवा ऑपरेशन देखील करू शकतील हा पूर्ण प्रकार ऑगमेंटेड रियालिटी यात मोडतो, त्यामुळे हेल्थ केअर अपारंपारिक ऑप्शन देखील अजूनही करिअरच्या माध्यमासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे.

३. पर्यावरणपूरक सामाजिक कार्यकर्ते (इको फ्रेंडली सोल्युशनस)

जगामध्ये वातावरणामध्ये बदल ही गोष्ट आता लपून राहिली नाही आहे त्यामुळे आपले पर्यावरण अर्थात वातावरण वाचवण्यासाठी इकोफ्रेंडली वॉरियर्सची आत्ताच्या घडीला खूप आवश्यकता आहे.

environment specialist

हे क्षेत्र किंवा हा पर्याय काही लोकांना नक्कीच कठीण वाटू शकतो, पण सोलार एनर्जी चा वापर करणे, पाण्याचा कमीत कमी वापर कसा होऊन देणार, इको फ्रेंडली विटांचा वापर कसा करणार अशा प्रकारच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवून त्या वापरण्यास लोकांना उद्युक्त करणं यासाठीच इको-फ्रेंडली सोशल वॉरियर्स यांची आज गरज आहे. यादेखील पर्यावरण पूरक ऑप्शन तुम्ही लोकांना देत आहात त्याद्वारे देखील आपण पैसे देखील कमवू शकता आणि पर्यावरणाचे महत्त्वदेखील लोकांपुढे मांडू शकता.

४. मशीन शिक्षण तज्ञ (मशीन लर्निंग)

मशीन लर्निंग हे नाव ऐकल्यावर आपल्या डोक्यामध्ये चक्र सुरू होतात की नक्की याला म्हणायचं तरी काय पण जेव्हा आपण एखादी गोष्ट इंटरनेटवर गुगल करतो तेव्हा त्या गोष्टीसाठी किंवा गोष्टी बरोबर लागणाऱ्या सर्व माहितीचा भंडारा गुगल आपल्या डोळ्यासमोर मांडतो आणि त्यांनाच मशीन लर्निंग म्हणतात.

machine learning

आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आयर्न मॅन हा चित्रपट पाहिला असेल त्यामध्ये ज्याप्रकारे दूरदृष्टी ठेवून चित्रपटा मधला नायक विविध प्रकारच्या सेल्फ हीलींग मशीन बनवतो अर्थात त्यामध्ये मशीन स्वतःची स्वतःला दुरुस्त करू शकते अशा प्रकारची टेक्नॉलॉजी त्यात तो बसवतो आणि याच पद्धतीला सोप्या भाषेमध्ये मशीन लर्निंग असं म्हणतात. काही वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल की गाडी स्वतःला विना चालक रस्त्यांवर चालू शकेल पण आता टेसला कंपनीचे माध्यमाद्वारे हे देखील साध्य झाले आहे आणि हेच आहे मशीन लर्निंग ! भविष्यामध्ये मशीन लर्निंग हा एक कॉम्प्लेक्स विषय असला तरीदेखील त्यामध्ये करिअर चा मोठा पर्याय उपलब्ध आहे.

५. विधीतज्ञ/ कायदेपंडित (लीगल ॲडव्हायझर) 

जॉली एल.एल.बी. सारखे चित्रपट आपल्याला फक्त कायद्याची एक बाजू दाखवतात. क्रिमिनल लॉ तर आहेच पण या व्यतिरिक्त भविष्यामध्ये भारतात आंतरराष्ट्रीय प्रतीचे कायदेपंडित किंवा विधी तज्ञ होणे गरजेचे आहे कारण टेक्नॉलॉजीमुळे सर्व देश हे एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत.

legal advisor

त्यात तुमच्या व्यवसायाचे नाव ट्रेडमार्क करण, इंटेल्लेक्च्युअल प्रोपर्टी राइट्स, कॉपीराईटस या प्रकारच्या गोष्टी आंतरराष्ट्रीयरित्या देखील संरक्षित करणं हे तेवढेच गरजेचे आहे, आणि ते शक्य आहे अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञ बनून. जरी हा करिअरचा पारंपारिक मार्ग असला तरीदेखील सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये दर दिवशी नवीन काही ना काही होत असतं आणि त्याला कायदेशीर झालर देण्यासाठी आणि त्या गोष्टी प्रोटेक्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या विधीतज्ञांची गरज ही लागणारच आहे.

६. डेटा विज्ञान तज्ञ (डेटा सायन्स)

जेव्हा गुगलने त्यांची ईमेल सर्व्हिस लॉन्च केली तेव्हा त्यांनी युजर्सना एक जीबी डेटा देण्यास सुरुवात केली तेव्हा बिल गेट्स म्हणाले होते एक जीबी डेटाची एवढी कोणाला गरज आहे आणि आता आपल्याला लक्षात येते आहे की टेक्नॉलॉजी मधले गुरु अर्थात बिल गेट्स देखील किती चुकीचे होते त्यांच्या डेटा संबंधित वक्तव्याबद्दल ! सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग यासारख्या अनेक गोष्टी या डेटा शी निगडीत आहेत.

data science

जेव्हा आपण इंटरनेटवर एखादी फ्री सर्विस वापरतो त्यावेळेला इंटरनेट आपल्याकडं काय घेते अर्थातच डेटा. तो तुमच्या नेट पॅक संबधी असेलच असा नाही काही वेळेला तुमची वैयक्तिक माहिती देखील त्या फ्री-सर्वीस बद्दल घेतली जाते ज्यामध्ये आपण वापरत असलेल्या मोबाईल मधला डेटा किंवा आपले पर्सनल डिटेल्स देखील समाविष्ट होऊ शकतात. या इंटरनेट कडून मिळणाऱ्या फ्री सर्विस साठी आपण आपली प्रायव्हसी थोडीफार सॅक्रिफाइस करतो देखील. हा जो डेटा सर्विस प्रोव्हायडर घेतात त्याचा वापर तुमच्या पर्यंत तुम्ही शोधत असलेली माहिती अधिक चांगल्या प्रकारे कशी पोहोचेल यासाठी त्याचा वापर करतात. अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा डेटा सायन्टिस ची वार्षिक सॅलरी एक कोटी होऊन देखील अधिक आहे. डेटा सायन्स या क्षेत्रांमध्ये जॉब करण्यासाठी आपल्याकडे कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनीअरिंग ची डिग्री गरजेची आहे.

७. मानसशास्त्र (सायकॉलॉजी) 

दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेणे हे एक प्रकारचे कौशल्य (सॉफ्ट स्किल) आहे. सगळ्यांनाच ते जमतं अशातली गोष्ट नाही.

Psychology experts

यासाठीच थेरपिस्ट, लाईफ कोचिंग टीचर्स, प्रोफेशनल कौन्सिलर यातली कार्यक्षेत्रे पुढच्या काही वर्षात डिमांडमध्ये येणार आहेत याचं कारण कमी वयामध्ये लोकांनी घेतलेले टेन्शन ! त्यांचे मानसिक आरोग्य बिघडू नयेत यासाठी त्यांना समजून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी अशा प्रकारचेच मानसशास्त्रज्ञ किंवा प्रोफेशनल कौन्सेलर यांची गरज पडणार आहे.

८. गेमिंग

लहानपणी आपण असा विचार करायचो की कम्प्युटरवर गेम खेळायला जाणे म्हणजे वेळेचा अपव्यय. पण सध्याच्या एकविसाव्या शतकामध्ये गेमिंग हेदेखील एक करियर क्षेत्र असू शकतो हे ज्या लोकांना माहिती नाही आहे, ते कदाचित अजूनही एकोणिसाव्या शतकातच आहेत.

gaming

जगामधला सर्वात मोठा युट्युबर प्युटीपाय हा देखील एक प्रोफेशनल गेमरच आहे. पण त्यासाठी देखील गेमिंग हे क्षेत्र देखील तेवढच समजून घेण गरजेचं आहे. ग्लोबल गेमिंग इंडस्ट्री ही ३०० बिल्यन डॉलर्स ची आहे यावरूनच आपण गेमिंग क्षेत्राचा विस्तार समजू शकता. गोष्ट ही गेमिंग पुरतीच मर्यादित नाही आहे तरी या बरोबर असलेले ऑर्गनायझर, कॉमेंट्रीटर्स, गेम डेव्हलपर गेम मीडिया मॅनेजर या ठिकाणीदेखील करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पण त्यासाठी गेमिंगलाच आपले काम समजणे आणि शिस्तीने त्याचे पालन करणे हे देखील तितकेच गरजेचे आहे. कोणीही मोबाईल मधला गेम खेळणारा व्यक्ती या क्षेत्रामध्ये आपले करियर बनवू शकतो त्यासाठी फक्त पाहिजे जिद्द आणि चिकाटी !

९. कचरा (वेस्ट मॅनेजमेंट)

कोणी सांगितलं कचऱ्याची किंमत नसते ? चायना मध्ये एका वर्षांमध्ये कचऱ्यापासून एवढ्या प्रमाणात कोबाल्ट मिळते जेवढे त्याठिकाणी वर्षभरामध्ये मायनिंग मधून देखील काढले जात नाही. हीच आहे कचराची किंमत किंवा वेस्ट मॅनेजमेंट!

e waste management

आपण इ-वेस्ट उदाहरण घेऊया, दर दोन वर्षानंतर आपण आपला मोबाईल हा बदलतो, तुम्हाला कल्पना नसेल पण ह्या जुन्या मोबाईल मध्ये काही इलेक्ट्रॉनिक्स पार्ट मध्ये खरोखरचं सोन (गोल्ड) वापरलेले असते आपण जर हे इ-वेस्ट रिकव्हर केले तर फक्त विचार करा किती प्रमाणात सोनं आपण गोळा करू शकतो. जगामध्ये वेस्ट मॅनेजमेंट मध्ये २ ट्रिलियन डॉलर ची उलाढाल होते. आणि भारतामध्ये स्वच्छता क्षेत्रामद्धे काम करून भविष्यात आपण नक्कीच चांगल करियर बनवू शकता, त्यासाठी गरज आहे आपण या इंडस्ट्रीमध्ये उतरून उद्योजक होण्याची.

१०. लीडरशिप

तुम्ही इतिहास बघा किंवा भविष्य पहा आपल्याला सर्वांना लीडरची गरज ही लागलीच आहे. नेतृत्व करण्याचे गुण तुमच्या मध्ये असतील तर लीडरशिप हा करियर ऑप्शन तुमच्यासाठीच आहे. पूर्वीच्या काळामध्ये राजा-महाराजा असायचे आता उद्योजक अर्थातच लीडर्स आहेत कारण लीडर्स जॉब घेत नाहीत तर जॉब देतात.

लीडर्स संधी फक्त स्वतःसाठी नाहीच तर आपल्या पुर्ण टीमसाठी देखील शोधतात, बिझनेस वाढवण्यासाठी बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ते बिजनेस मधील गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. कृषी क्षेत्रामध्ये लीडर्स ची गरज आहे कारण हे एक प्रकारच्या फार्मर्स प्रोडूसर  ऑर्गनायझेशनची निर्मिती करून सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना ते एकत्र आणू शकतील आणि त्यातूनच सर्व शेतकऱ्यांचा फायदा होईल, फॅक्टरीमध्ये मशीन असो व मजदूर त्या सर्वांना सांभाळून घेण्यासाठी लीडर्सची गरज आहे. लीडर हा माणूस जो कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेऊ शकतो. लीडरशिप क्वालिटी फार कमी लोकांमध्ये असते आणि आपल्या मध्ये लीडरशिप क्वालिटी असल्यास आपण नक्कीच हा करियर ऑप्शन म्हणून निवड करू शकता

RELATED ARTICLES

Most Popular