26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeSindhudurgआता तरी जीवरक्षकांची नियुक्ती करणार का ....!!

आता तरी जीवरक्षकांची नियुक्ती करणार का ….!!

पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिकांना मदतीसाठी आरडाओरड करून बोलावले.

औरंगाबाद येथून सात जणांचा पर्यटकांचा समूह दुपारी एकच्यासुमारास तारकर्ली समुद्रावर फिरायला आला होता. यात सचिन एकनाथ जाधव, विनोद काकासाहेब खिल्लारे, विठ्ठल विष्णू दळवी, सचिन शिवाजी देठे, योगेश पुंडलिक दळवी, योगेश आत्माराम खिल्लारे, चालक रमेश एकनाथ काटकर सर्व रा. औरंगाबाद यांचा समावेश होता. यातील चालक सोडून उर्वरित सहाजण दुपारी पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात स्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले. यातील पाच जण काही वेळातच समुद्रातून बाहेर आले, तर सचिन जाधव एकटाच समुद्रात मनमुराद पोहत होता.

बराच वेळ झाला तरी सचिन अजून बाहेर आला नाही म्हणून पाहण्यासाठी गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडत असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिकांना मदतीसाठी आरडाओरड करून बोलावले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ वैभव सावंत, दशरथ चव्हाण यांनी तत्काळ धाव घेत समुद्रात उडी घेत बुडणाऱ्या सचिनला किनाऱ्यावर आणले. मात्र, त्यापूर्वीच गुदमरून त्याचा मृत्यू ओढवला होता.

तारकर्ली येथील पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात बुडून सचिन एकनाथ जाधव वय २२, रा. भिवपूर, भोकरदन-जालना या पर्यटकाचा मृत्यू झाला. दुपारी तीनच्या दरम्यान हि घटना घडली. पोलिस पाटील भानुदास येरागी घटनास्थळी येत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला.  पोलिस निरीक्षक विजय यादव, सहायक निरीक्षक सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन याच्या मागे आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

यावर्षीचा पर्यटन हंगामाला नुकतीच सुरूवात होत आहे. गेली अनेक वर्षे पर्यटकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने किनारपट्टी भागात जीवरक्षकांची नियुक्ती करण्याबाबत सातत्याने स्थानिकांकडून मागणी केली जात आहे. जीवरक्षक नसल्याने आतापर्यंत अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून किनाऱ्यावर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन दिले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular