25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriपर्यटक महिलेशी लज्जात्मक वागणूक, संशयिताला अटक

पर्यटक महिलेशी लज्जात्मक वागणूक, संशयिताला अटक

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि राहण्यासाठी हॉटेल कृष्णा सी व्ह्युमधील कामगाराने ग्राहक महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन संशयित कामगाराला अटक करण्यात आली.

“अतिथी देवो भव” या उक्तीप्रमाणे, येणारे पर्यटक आणि त्यांच्या सुविधांसाठी पर्यटन व्यवसायिक कायमच तयार असतात. आपल्या पर्यटकांना विविध सोई सुविधा पुरविण्यासाठी हॉटेल्स कार्यतत्पर असतात. परंतु, काही कामगारांच्या बेशीस्त वर्तणुकीमुळे या व्यवसायाला कुठे न कुठे तरी गालबोट लागतेच.

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि राहण्यासाठी हॉटेल कृष्णा सी व्ह्युमधील कामगाराने ग्राहक महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन संशयित कामगाराला अटक करण्यात आली.

ईस्माईल करीम सय्यद रा. मुंबई असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो सध्या कामानिमित्त हॉटेल कृष्णा सी व्ह्यु गणपतीपुळे येथे असतो. संबंधित ग्राहक पिडीत महिला एका दाम्पत्याचे मुल सांभाळण्याचे काम करते. मंगळवारी हे दाम्पत्य व पिडीत महिला पर्यटनासाठी गणपतीपुळे येथील हॉटेल कृष्णा सी व्ह्युमध्ये थांबले होते. पिडीतेला रहाण्यासाठी हॉटेलमध्ये स्वतंत्र रुम नंबर ११०  देण्यात आली होती.

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान संशयित ईस्माईल सय्यदने पिडीतेच्या रुमचा दरवाजा वाजवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे संभाषण केले. याप्रकरणी पिडीतेने त्वरित हि बाब सोबतच्या दाम्पत्याला सांगितली. त्याच्या विरोधात पिडीतेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर जयगड पोलिसांनी ईस्माईलला गुरुवारी सकाळी ९.३०  वा. अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. अशा प्रकारच्या कामगारांमुळे एकट दुकट महिलांनी फिरणे अथवा हॉटेल, लॉजवर राहणे कठीण बनले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular