27.1 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriपर्यटक चिपळुणात स्थिरावण्याची गरज, शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता

पर्यटक चिपळुणात स्थिरावण्याची गरज, शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता

हे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्केटिंगची आवश्यकता आहे.

कोकणात फिरण्यासाठी येणारे पर्यटक चिपळूणमध्ये येऊनही शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देत नाहीत. हे पर्यटक चिपळुणात थांबावेत आणि येथील पर्यटनाचा आनंद घ्यावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील पर्यटनस्थळाला वर्षातून एकदा निधी दिल्यास त्याचा सर्वार्थाने विकास होईल. पायाभूत सुविधांसह योग्य मार्केटिंग झाले तर पर्यटन व्यवसायातून रोजगार संधी निर्माण होतील. सह्याद्री पर्वतरांगा, जैवविविधतेने समृद्ध असलेली जंगले, हिरवाईने नटलेले डोंगर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, खाड्यांच्या माध्यमातून निसर्गान मुक्तपणे दिलेले दान, तसेच साहित्यिक, कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, महापुरुषांच्या स्मारकांचा समृद्ध वारसा चिपळूणला लाभला आहे. हा वारसा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित व्हावा यासाठी शासनाने पाउले उचलली पाहिजते.

मुंबई-पुण्यातील पर्यटक रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गुहागर, दापोली आणि गोव्याला जाताना चिपळुणात जेवणासाठी किंवा मुक्कामासाठी थांबतात. हे पर्यटक किमान एक दिवस चिपळूणला थांबले तर चिपळूणच्या अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा होईल. डेरवणची शिवसृष्टी, शहरातील पांडवकालीन लेणी, परशुराम गावातील भगवान परशुरामाचे मंदिर, सवतसडा धबधबा, गोवळकोट किल्ला ही मोजकी पर्यटनस्थळे पर्यटकांना माहीत आहेत. येथील लोकमान्य टिळक वाचनालयाचे अपरांत संशोधन केंद्र आणि त्यातील ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा राज्यातील पर्यटकांपर्यंत पोहोचला तर तो पाहण्यासाठी वर्षाला शेकडो पर्यटक येथे येतील.

मार्कंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा, नारायण तलावाचे झालेले सुशोभीकरण आणि नाट्यरसिकांसाठी सुरू झालेल्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची माहिती आणि त्यात होणारे नाटकाचे प्रयोग पर्यटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. शहर आणि परिसरातील ऐतिहासिक मंदिरे, वाशिष्ठी खाडीतील मगरींचे दर्शन, खाडीतून होणारे निसर्गाचे दर्शन, विसावा पॉईंट, सह्याद्रीच्या कुशीतील दुर्लक्षित धबधबे आणि गडकिल्ल्यांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सुरक्षेच्यादृष्टीने कोयना प्रकल्प परवानगी शिवाय पाहता येत नाही; मात्र कोळकेवाडी धरणाला भेट देऊन या प्रकल्पाची रचना लक्षात घेता येते. त्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही. हे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्केटिंगची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular