22.4 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

रत्नागिरी रेल्वेस्थानकात तिकीट विक्रीत काळा बाजार

रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री ठिकाणी काळ्या...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाल्यानंतर...

‘नो रोड, नो वोट !’ संगमेश्वरातील संभाजीनगरचा संतापाचा उद्रेक

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगर येथील ग्रामस्थांचा संयम अखेर...
HomeRatnagiriदिवाळी सुटीत एसटीला पर्यटकांची पसंती...

दिवाळी सुटीत एसटीला पर्यटकांची पसंती…

ग्रामीण मार्गावरील बस प्रवाशांनी फुल्ल भरून धावत आहेत.

दिवाळीचा सण संपला तरीही शाळा, महाविद्यालयांना २ नोव्हेंबरपर्यंत सुटी आहे; परंतु सुट्यांचा फायदा घेऊन पर्यटन, देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासासाठी एसटीला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे बस हाऊसफुल्ल भरून धावत आहेत. रत्नागिरी विभागातून मुंबई, पुण्यासह लांबच्या पल्ल्यासाठी नियमित १५० गाड्या धावतात याशिवाय १७ ऑक्टोबरपासून १५ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दिवाळी सुटीमुळे नातेवाइकांकडे, पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी बाहेर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांसह बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही वाढल्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी आहे. प्रवाशांमुळे लांब तसेच ग्रामीण मार्गावरील बस प्रवाशांनी फुल्ल भरून धावत आहेत.

राज्य परिवहन महामंडळातर्फे महिलांसाठी तिकीटदरात पन्नास टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात शंभर टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा फायदा प्रवासी घेत आहेत. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठांची एसटीला अधिक पसंती आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्यांचे भारमान वाढले आहे. रत्नागिरी विभागातर्फे छत्रपती संभाजीनगर, तुळजापूर, बारामती, शनीशिंगणापूर, नृसिंहवाडी, अक्कलकोट, पंढरपूर, स्वारगेट, मिरज, पुणे, बोरिवली, नालासोपारा मार्गावर १५ जादा गाड्या १७ ऑक्टोबरपासून सोडण्यात येत आहेत. या गाड्या ५ नोव्हेंबरपर्यंत सोडण्याचे नियोजन आहे.

ऑनलाइन आरक्षण उपलब्ध – रत्नागिरी विभागाच्या नियमित गाड्यांसह दिवाळीसाठी जादा गाड्यांचे आरक्षण ऑनलाइन उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता येत आहे. गर्दीतून धक्के खात प्रवास करण्यापेक्षा आरक्षण तिकीट काढून आरामदायी प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची अधिक पसंती आहे.

RELATED ARTICLES

Most Popular