29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

खेडच्या जगबुडी पुलाजवळ भीषण अपघात; ११ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर खेड जवळ पुलाजवळ...

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी अडिच कोटींचा ऐवज केला जप्त

पोलिसांकडून डमी ग्राहकाने फोन केला... मोठं गिऱ्हाईक...

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...
HomeRatnagiriपारंपारीक मच्छीमारांवर कारवाई झाली तर एकत्र लढायचे, संघटना स्थापन

पारंपारीक मच्छीमारांवर कारवाई झाली तर एकत्र लढायचे, संघटना स्थापन

रत्नागिरी जिल्हा मच्छिमार नौका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजन सुर्वे यांनी पारंपारीक मच्छीमारांना बैठकीसाठी एकत्र आणले.

पर्ससीन, पारंपारिक आणि एलईडी लाईट द्वारे मासेमारी करणाऱ्या व्यावसायीकांमध्ये विविध प्रकारचे मतभेद सुरु आहेत. एलईडीचा वापर करुन केल्या जाणार्‍या मासेमारी विरोधात लढण्यासाठी स्थापन केलेल्या रत्नागिरी तालुका पारंपारीक मच्छिमार संघर्ष संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल मुरकर यांची निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पारंपारीक मच्छीमारांची बैठक मिर्‍या येथे पार पडली. त्यात प्रमुख मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा मच्छिमार नौका चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजन सुर्वे यांनी पारंपारीक मच्छीमारांना बैठकीसाठी एकत्र आणले. रत्नागिरी तालुक्यातील पारंपारीक मच्छीमारांवर कारवाई झाली तर ती सर्वांनी एकत्र मिळून त्याविरोधात लढा उभारायचा असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

त्याचप्रमाणे आपला व्यवसाय वाचविण्यासाठी आणि सुरक्षित चालण्यासाठी प्रत्येक गावात जाऊन पारंपारिक मच्छीमारांना भेटून जागृती केली जाणार असल्याचे ठरले. तसेच ज्या पारंपारीक मच्छिमारांनी आपली नौका एलईडी लाईटसाठी दिली असेल, तर त्याची चौकशी करून नौका मालकाला समज देण्यात येणार आहे. जर त्यानी ऐकलेच नाही तर संबंधितावर मत्स्य विभागामार्फत कारवाई केली जाईल. पारंपारीक मच्छिमारांच्या लढ्यासाठी पुढील निर्णय रत्नागिरी जिल्हा मच्छिमार नौका चालक-मालक संघटनेशी चर्चा करुन घेण्यात येणार आहे, असे छोट्याशेठ भाटकर, गुरुदत्त कीर यांनी बैठकीत सांगितले.

मच्छिमार नेते आप्पा वांदरकर यांनी रत्नागिरी तालुका पारंपारीक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष विशाल मुरकर यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष विशाल मुरकर, उपाध्यक्षपदी तेजस प्रकाश, गुरुनाथ शिरगावकर, अमरेश धातकर, दिलीप सुर्वे, सचिव दत्तगुरु कीर, खजिनदार किशोर माईण, सदस्य म्हणून दिपक पाटील, अमित विलणकर, विनायक मयेकर, विरेंद्र नार्वेकर, पंकज पिलणकर, श्रीदत्त भुते, अतुल भुते यांची निवड करण्यात आली. तसेच सल्लागारपदी आप्पा वांदरकर, खलिल वस्ता, वामन शेटये, दिनेश सावंत, रणजित भाटकर यांची निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular