गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात मोठ्या संख्येने जाणाऱ्या चाकरम ान्यांसाठी तब्बल २०२ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याच्या निर्णयामुळे आनंदित झालेल्या कोकणवासियांच्या पदरी मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी निराशाच पडली आहे. कारण या २०२ विशेष गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या ८ मिनिटात सर्व गाड्यांची तिकिटे संपली आहेत. अवघ्या ८ मिनिटात सर्व गाड्या कशा काय फुल्ल झाल्या असा प्रश्न चाकरमान्यांना पडला असून तिकिट बुकिंगमध्ये काळा बाजार होत असल्याचे आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे. कोकणात येणाऱ्या गाड्या अवघ्या ५ ते ८ मिनिटात फुल्ल होण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही.
गतवर्षी देखील अशाचं गाड्या अवघ्या काही मिनिटात फुल्ल झाल्या होत्या त्यावेळी देखील बुकिंगमध्ये काळाबाजार होत असल्याचे आरोप झाले होते. प्रवाशांनी त्यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला होता. तिकिट बुकिंगची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यावेळी करण्यात आली होती. हाच अनुभव पुन्हा एकदा आल्याने आता शकते. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ही सुविधा देण्यात आली होती. त्याअंतर्गत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ५८ वर्षांवरील महिलांना दुरंतो, शताब्दी, जनशताब्दी, राजधानी, मेल आणि एक्स्प्रेस अशा विविध गाड्यांच्या भाड्यात लक्षणीय सवलत देण्यात आली.
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये सरकार रेल्वेवर अतिरिक्त खर्च करणार आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत मिळण्याची शक्यता पुन्हा वाढू शकते. भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. ज्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारांनी ग्रासले आहे त्यांच्यासाठी प्रवास सोपा व्हावा यासाठी, रेल्वे रेल्वे तिकीटावर ५०% ते १००% विशेष सूट देते. या यादीमध्ये १००% पर्यंत सूट मिळू शकणारे रुग्ण आणि अपंग व्यक्तींचा समावेश आहे.
या विशेष आजारांमध्ये कर्करोग, थैलेसेमिया, टीबी, एड्स, अॅनिमिया, हिमोफिलिया यांचा समावेश आहे. याशिवाय हृदयशस्त्रक्रियेसाठी जाणारे रुग्ण, ऑपरेशन किंवा डायलिसिससाठी जाणारे मूत्रपिंडाचे रुग्ण, कुष्ठरोगग्रस्तांना रेल्वे तिकिटात सवलत दिली जाते. त्यासाठी रुग्णांनी कागदपत्रांची पडताळणी करून घेणेही गरजेचे आहे. यावेळी अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित इतर ही अनेक घोषणा होऊ शकतात. रेल्वेचे जाळे विकसित होणे आणि नवीन गाड्या सुरू होणे अपेक्षित आहे.